Take a fresh look at your lifestyle.

नरेंद्र मोदी स्टेडीयम : जगातील सर्वात मोठ्या स्टेडीयमच्या या काही खास गोष्टी; वाचा, रंजक आणि महत्वाची माहिती

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच गुजरातमधील अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन झाले. यावेळी स्टेडियमचे नाव ‘मोटेरा स्टेडियम’ वरून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे करण्यात आले.

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा तिसरा कसोटी सामना आजपासून या मैदानावर खेळला जाईल. मोटेराचे हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे, ज्यात 1 लाख 10 हजार प्रेक्षकांची बसण्याची क्षमता आहे.

Advertisement

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 3 सराव मैदान, 1 इनडोअर क्रिकेट अकादमी, 4 ड्रेसिंग रूम, 1 क्लब हाऊस, 1 शयनगृह आणि 76 कॉर्पोरेट बॉक्स आहेत. या कॉर्पोरेट बॉक्समध्ये 25 जागा आहेत. क्लब हाऊसमध्ये इनडोर आणि आउटडोर खेळांसाठी 55 खोल्या आहेत. याशिवाय स्टेडियमच्या प्रत्येक स्टँडवर फूड कोर्ट, पार्टी एरिया, थ्रीडी प्रोजेक्टर / थिएटर टीव्ही रूम, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, स्क्वॅश कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, 1 ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव आणि 1 व्यायामशाळा आहे.

Advertisement

‘मोटेरा स्टेडियम’बद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात क्रिकेटसाठी ११ प्रकारच्या खेळपट्ट्या आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी या स्टेडीयमच्या भूगर्भात एक आधुनिक यंत्रणा ठेवण्यात आली आहे, ज्याच्या सहाय्याने पाऊस पडल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात हे मैदान पुन्हा तयार करता येईल. या पार्किंगमध्ये 3000 कार आणि 10,000 दुचाकी वाहने पार्क होऊ शकतात.

Advertisement

‘सरदार पटेल स्टेडियम’ च्या नूतनीकरणाची योजना गुजरातचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्याची पुनर्बांधणी वर्ष 2017 मध्ये सुरू झाली. 3 वर्षात 750 कोटी रुपये खर्च केल्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये ‘मोटेरा स्टेडियम’ तयार झाले.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply