Take a fresh look at your lifestyle.

जास्त पावरफुल, जास्त सेफ : नवी स्विफ्ट लॉंच; वाचा, काय आहेत फीचर्स आणि किंमत

मुंबई :

Advertisement

मारुती सुझुकी इंडिया (एमएसआय) ने 24 फेब्रुवारी रोजी प्रीमियम हॅचबॅक स्विफ्ट अपडेटेड वर्जन (2021 मारुती स्विफ्ट) लाँच केली. या स्विफ्टची दिल्लीची शोरूम किंमत 5.73 लाख-8.41 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मारुतीकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, नवीन स्विफ्ट अधिक सामर्थ्यवान आहे आणि तिला कमी इंधन लागते. तसेच नवीन सेफ्टी फीचरचा या गाडीत समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

कंपनीचा असा दावा आहे की, नवीन स्विफ्ट मॅन्युअल ट्रांसमिशनची इंधन कार्यक्षमता 23.2 किलोमीटर आहे तर ऑटोमैटिकची 23.76 किलोमीटर आहे.

Advertisement

मारुती सुझुकी इंडियाने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, नवीन स्विफ्ट २०२१ ही ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केली गेली आहे. 2005 मध्ये मारुती सुझुकी इंडियाने स्विफ्ट लॉन्च केली होती. कंपनीचे म्हणणे आहे की, स्विफ्टने देशात एक प्रकारे प्रीमियम हॅचबॅक विभागात क्रांती घडविली आहे.

Advertisement

मॅन्युअल ट्रिमची किंमत 5.73 लाख रुपये आणि 7.91 लाख रुपयांपर्यंत ठेवली आहे. त्या तुलनेत एजीएस व्हेरिएंटची किंमत 6.86 लाख ते 8.41 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मारुती सुझुकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मॅन्युअल ट्रांसमिशनसह 1.2 लिटर पेट्रोल मॉडेलची इंधन कार्यक्षमता ऑटोमैटिकपेक्षा कमी आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply