Take a fresh look at your lifestyle.

शिवसेना अजूनच अडचणीत; महापौर किशोरी पेडणेकर यांना ‘ते’ प्रकरण भोवणार?

मुंबई :

Advertisement

शिवसेना सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी नाव जोडले जात आहे. या प्रकरणामुळे आधीच शिवसेना अडचणीत आलेली असताना महापौर किशोरी पेडणेकर यांच्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत अजून वाढ होण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए प्रकल्पातील सहा फ्लॅट बळकावल्याच्या संदर्भात आरोप केले गेले आहेत. गोमाता जनता एससारए प्रकल्पामध्ये लाभार्थी नसताना देखील किशोरी पेडणेकर यांनी सहा फ्लॅट बळकावले. त्यानंतर त्या फ्लॅटच्या पत्त्याचा वापर करून आपल्या संबंधित कंपन्यादेखील त्या फ्लॅटमध्ये स्थापन केल्या आहेत. 

Advertisement

भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरलेले आहे. तसेच त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी केलेल्या या भ्रष्टाचाराविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी विनंतीही सोमय्या यांनी केली आहे.

Advertisement

या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दाखल घेतली आहे. तसेच पेडणेकर यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. आता यावर पेडणेकर आणि शिवसेना काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply