Take a fresh look at your lifestyle.

शिक्षकांना मिळणार दिलासा; बँकेने घेतला ‘तो’ महत्वाचा निर्णय

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. अनागी मिनाडणूक लक्षात घेऊन सभासदांना लाभ देण्याचा हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Advertisement

दि. १६ मार्चपासून बँकेच्या कर्जाचे व्याजदर ०.४० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय बँकेने घेतला. त्यामुळे २० ते ३० लाख रुपयांचे कर्ज घेतलेल्यांना वार्षिक सुमारे आठ ते बारा हजार रुपयांचा फायदा होईल, अशी माहिती संचालक मंडळाने दिली आहे.

Advertisement

शिक्षक संघ व गुरुमाउली मंडळाच्या तालुकाध्यक्षांच्या सहविचार सभेत व्याजदर कमी करण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. सर्वसामान्य सभासदही व्याजदर कमी करण्याची सातत्याने मागणी करत होता. त्याला प्रतिसाद देत १६ मार्चपासून शिक्षक बँकेने जामीन कर्जावरील व्याजदर ०.४० टक्क्यांनी कमी केले आहेत.

Advertisement

सध्या व्याजदर ९.९० असून तो आता साडेनऊ टक्के होणार आहे. शैक्षणिक कर्ज, गृहबांधणी, गृह खरेदी, गृह तारण व वाहन खरेदी या सर्व कर्जावरील व्याजदर ९ % केला असून त्यात सुमारे ०.९० टक्के घट झाली आहे. बँकेत आर. टी. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा झाली.

Advertisement

यावेळी जिल्हा संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, गोकूळ कळमकर, किसन वराट, बाळासाहेब सरोदे, संदीप मोटे, नारायण पिसे, मच्छिंद्र लोखंडे, विठ्ठलराव फुंदे, बाळासाहेब तापकीर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्युल्लता आढाव, अंजली मुळे, दत्ता कुलट, दे. शि. जाधव, मोहनराव‌ पागिरे, बाळासाहेब चाबुकस्वार, संतोष दुसंगे, साहेबराव अनाप, शरद सुद्रिक, बाळासाहेब मुखेकर, उषा बनकर, सलीमखान पठाण, किसनराव खेमनर, गंगाराम गोडे, बाबा खरात, अर्जुन शिरसाट, सुयोग पवार, अनिल भवार, राजकुमार साळवे आदी उपस्थित होते.
व्याजदर कपातीच्या निर्णयामुळे पस्तीस लाखांचे कर्ज असणाऱ्या सभासदांना वार्षिक १४ हजार, तर ३० लाख कर्ज असणाऱ्या सभासदांना वार्षिक बारा हजार आणि वीस लाख कर्ज असणाऱ्या सभासदांना वार्षिक आठ हजार रुपये फायदा होणार आहे. सत्तेवर येऊन कर्ज दर न वाढवता व्याजदर कमी करणारे हे एकमेव संचालक मंडळ आहे, असा दावाही बँकेतील सत्ताधारी मंडळाने केला.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply