Take a fresh look at your lifestyle.

‘मग नक्षलवादी होण्याची तरी परवानगी द्या..’; शेतकऱ्याने पाठवले थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई / औरंगाबाद :

Advertisement

शेती करणे म्हणजे आपल्याच हाताने गरिबीची पेरणी करणे तर नाही ना अशी वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची घोषणाबाजी जोमात असतानाच शेतीचे वास्तव मात्र विदारक आहे. यालाच कंटाळून एका शेतकऱ्याने थेट नक्षलवादी होण्याची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागितली आहे.

Advertisement

ताकतोडा (ता.सेनगाव) येथील शेतकरी नामदेव पतंगे यांनी अशी अजब मागणी करून सरकारचे लक्ष वेधले आहे. साहेब, विकंल तेच पिकंल ही योजना सुरू केली, मात्र पिकलंच नाही तर विकणार काय, अजूनही बँकेचे अधिकारी कर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहेत, विद्युत पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या परिस्थितीत जगणे कठीण झाले असून आता नक्षलवादी होण्याची परवानगी द्या, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

मुख्यमंत्री कार्यालयासोबतच तहसील प्रशासनाकडे पत्र पाठवून त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. या पत्रामुळे सेनगाव तहसील प्रशासनात खळबळ उडाली आहे. सेनगावचे तहसीलदार जिवककुमार कांबळे यांनी याप्रकरणी कार्यवाही सुरू केली आहे.

Advertisement

पत्रात त्यांनी म्हटले आहे की, बँकेकडून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर मागील कर्जवसुलीसाठी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहेत. गहू व इतर पिकांना पाणी देण्याची वेळ असताना वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने गव्हाचे पीक देखील हाती येणार नाही. वीज कंपनीकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. या वर्षीही बँका पीक कर्ज देण्यास तयार नाहीत त्यामुळे नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी.

Advertisement

शेती हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. शेतावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मागील काही वर्षांत शेतीमध्ये लागवडीचा खर्चही निघाला नाही. शासनाची कर्जमाफीची योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचलीच नाही. एवढेच नव्हे तर शासनाने विकेल तेच पिकेल ही योजना हाती घेतली. मात्र यामध्ये पिकलेच नाही तर विकणार काय, असा कळीचा मुद्दा पतंगे यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply