Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या कायद्याविरोधात व्यापारी आक्रमक; दिली थेट देशव्यापी बंदची हाक

पुणे :

Advertisement

‘एक देश, एक कर’ अशी गोंडस घोषणा देतानाच जीएसटी कराचे पाच टप्पे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पंचरंगी कराचे ओझे देशावर लादले होते. कृषी निविष्ठा आणि इतरही अनेक वस्तूंचे भाव यामुळे कमी होण्याऐवजी वाढले होते. पेट्रोल-डीझेल यांचीही तीच दशा झाली. त्यातच अनेक जाचक अटी आल्याने त्या दूर करण्याच्या मागणीसाठी देशभरातील व्यापाऱ्यांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे.

Advertisement

काॅन्फेडरेशन आॅफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेेचे राज्य उपाध्यक्ष अनिल नेनवाणी यांनी याबाबत सांगितले आहे की, जीएसटीमधील जाचक तरतुदींच्या विरोधात देशभरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (दि. २६) बंद पुकारला आहे. यामध्ये राज्यातील सर्वच व्यापारी सहभागी होणार आहेत.

Advertisement

या बंदमध्ये राज्यातील सर्व लहान, मोठे व्यापारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांच्या इतर संघटनांनीही या बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

या आहेत व्यापाऱ्यांना जाचक वाटणाऱ्या अटी आणि व्यापाऱ्यांच्या मागण्या :

Advertisement
  • जीएसटी कायद्यामध्ये अनेक जाचक अटी व तरतुदी आहेत.
  • व्यापाऱ्यांनी दर महिन्याच्या ११ तारखेपर्यंतच रिटर्न भरावे, त्याशिवाय त्यांना सेटऑफ मिळणार नाही.
  • मात्र ही अट रद्द करून रिटर्न कोणत्याही तारखेस भरण्याची परवानगी दिली पाहिजे. तसेच टीसीएस व टीडीएस कपात करण्याचे कामही व्यापाऱ्यांना करावे लागणार आहे.
  • या कायद्यांमध्ये अनेक जाचक अटी व्यापाऱ्यांवर लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
  • या कायद्यातील अटी रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे.

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply