Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी… मोदी सरकार ‘या’ क्षेत्रातील शेकडो कंपन्या विकणार

मुंबई :

Advertisement

सध्या मोदी सरकारने देशातील बड्या बड्या देशातील कंपन्या विकण्याचा धडाका लावला आहे. केंद्र सरकारच्या कंपन्या विक्रीच्या निर्णयावर टीकाही होत आहे. मात्र कुणालाही न जुमानता आपल्या हेकेखोर स्वभावाप्रमाणे केंद्र सरकारने अजून तब्बल 100 कंपन्या विकण्याचे नियोजन केले आहे.

Advertisement

केंद्रीय अर्थ खात्यांतर्गत येणाऱ्या गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील आणखी १०० कंपन्यांची विक्री करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदींनी सरकारी उपक्रमांमधील सरकारी भागीदारी काढून घेण्याच्या निर्णयाचं समर्थन केले.   

Advertisement

मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने १०० हून अधिक कंपन्यांचे परिक्षण केले असून त्यांच्या निर्गुंतवणूकीकरणामधून अडीच लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे. २०२१-२२ मध्ये देशातील अर्थव्यवस्थेची वाढ होण्याच्या दृष्टीने रोड मॅप तयार करणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे. यामध्ये निर्गुंतवणूकीसंदर्भातील उद्देश स्पष्ट करण्यात आले आहेत.

Advertisement

सार्वजनिक क्षेत्रातील अनेक कंपन्या तोट्यात आहेत. अशा कंपन्यांना करदात्यांच्या पैशांमधून मदत करावी लागते. केवळ वारसा म्हणून मिळालेल्या सरकारी कंपन्या सरकारकडून चालवता येणं शक्य नाही, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

Advertisement

सरकार जुलै-ऑगस्टपर्यंत एअर इंडिया आणि बीपीसीएलमधील भागीदारी विकून या दोन्ही कंपन्यांमधील निर्गुंतवणूक करेल असं सांगितलं जात आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply