Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कटू मुद्दयावरुन भारताने पाकिस्तानला सुनावले; स्वत:चे ठेवायचे झाकून आणि…

दिल्ली :

Advertisement

चीन आणि पाकिस्तान गरजेवेळी भारताच्या पुढे पुढे करतात आणि इतरवेळी काड्या करतात, हे भारतासाठी नवीन नसले तरीही भारत नेहमीच मोठ्या भावाप्रमाणे या दोन्ही देशांच्या मदतीची भूमिका घेतो.

Advertisement

भारताच्या दिलदारपणाचे अनेक अनुभव या दोन्ही देशांना आहेतच. आता चीन थार्‍यावर आला आहे मात्र पाकिस्तानची पुन्हा कुरकुर सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या मानवी हक्क मंत्री शिरीन मिझारी यांनी मानवी हक्क परिषदेतील भाषणामध्ये भारतावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले.

Advertisement

जम्मू काश्‍मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप मिझारी यांनी केला आहे. याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान चांगलेच सुनावले आहे. संयुक्‍त राष्ट्रातील कायमस्वरुपी मिशनमधील दुसऱ्या सचिव सीमा पुजानी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Advertisement

त्या म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये मानवी हक्कांची स्थिती अतिशय वाईट आहे. तेथे संस्था पातळीवरील भेदभाव आणि अल्पसंख्यांकांविरोधातील छळ अव्याहतपणे सुरू आहे. 

Advertisement

भारताविरूद्ध निराधार आणि द्वेषयुक्त प्रचार करण्यासाठी पाकिस्तान सातत्याने विविध व्यासपिठांचा गैरवापर करत आहे, हे काही नवीन नाही.

Advertisement

यावेळी त्यांनी पाकिस्तानची पोलखोल करत सांगितले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी घातलेल्या अतिरेकी संघटना आणि दहशतवाद्यांचा पाकिस्तान हा सर्वात मोठा देश संरक्षक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बंदी घातलेल्या 126 व्यक्ती आणि 24 संस्था या पाकिस्तानशी संबंधित आहेत.

Advertisement

एकूणच काय तर पाकिस्तानची स्वत:ची अवस्था वाईट असताना शेजारच्या घरात डोकून बघण्याची त्यांची जुनी खोद अजूनही गेलेली नाही.    

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply