Take a fresh look at your lifestyle.

‘केंद्र सरकारने ताकाला जाऊन भांडे लपवू नये’ म्हणत शिवसेनेने सांगितली ‘ती’ गोष्ट

मुंबई :

Advertisement

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज चीन-भारत संबंधांवर भाष्य करत मोदी सरकारची दुटप्पी भूमिका समोर आणली आहे. तसेच केंद्रावर टीकाही केली आहे.

Advertisement

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

Advertisement

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ‘टिकटॉक’सह 59 चिनी अॅप्सना हिंदुस्थानात बंदी घातली गेली. चीनसोबतचे इतरही काही व्यापारी करार रद्द करण्यात आले. चिनी गुंतवणुकीवर निर्बंध घातले गेले.

Advertisement

‘आत्मनिर्भर हिंदुस्थान’ची फोडणी देऊन या ‘चिनी कम’ धोरणाला राष्ट्रवादाची झालर चढवली गेली. मोदी सरकारने चीनची कोंडी केल्याचे ढोल पिटले गेले. मग आता आठच महिन्यांत असे काय घडले की, 45 चिनी कंपन्यांना हिंदुस्थानातील

Advertisement

व्यवसायासाठी लालगालिचे

Advertisement

अंथरले जात आहेत? आत्मनिर्भरता आणि राष्ट्रवादाचे ढोल पोकळ निघाले की चीनच्या दबावाखाली आपण नरमलो?

Advertisement

हिंदुस्थानातून चीनला होणारी निर्यात वाढली आणि 2019 च्या तुलनेत हिंदुस्थान-चीन व्यापार काही प्रमाणात कमी झाला हे खरे असले तरी 2020 मध्ये चीन हाच व्यापारात हिंदुस्थानचा सर्वात मोठा भागीदार राहिला ही वस्तुस्थिती आहे.

Advertisement

चिनी वस्तूंवर बहिष्कार, स्वदेशीचा नारा, चिनी अॅप्सवर बंदी वगैरे फुगे राष्ट्रवादाची हवा भरून हवेत सोडले गेले, पण हिंदुस्थानी व्यापार मंत्रालयाच्याच तपशिलाने त्या फुग्यांना टाचणी लावली आहे. आता तर काही चिनी कंपन्यांनाही हिंदुस्थानात व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

म्हणजे तिकडे सीमेवर चीन माघार घेतो आणि इकडे व्यापारात आपले सरकार त्याला ‘पुढे चाल’ देते. केंद्र सरकार ना हा ‘योगायोग’ मान्य करील, ना तिकडे ‘माघार’ आणि इकडे ‘पुढाकार’ या चालीचा खुलासा करील. अर्थात मांजर डोळे मिटून दूध पिते तरी जगाला ते दिसतेच.

Advertisement

केंद्र सरकारने हे विसरू नये आणि चीनसारख्या धोकेबाज शेजाऱयाबाबत तरी ताकाला जाऊन भांडे लपवू नये, इतकेच!

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply