Take a fresh look at your lifestyle.

तिकडे ‘जितं मया’ करायचे आणि इकडे टिऱया बडवायच्या; मोदी सरकारच्या दुट्टपीपणाचे शिवसेनेने काढले धिंडवडे

मुंबई :

Advertisement

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज चीन-भारत संबंधांवर भाष्य करत मोदी सरकारची दुटप्पी भूमिका समोर आणली आहे. तसेच केंद्रावर टीकाही केली आहे.

Advertisement

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

Advertisement

लडाख सीमेवरील हिंदुस्थान-चीन तणाव गेल्या आठवडय़ात निवळला. आता हिंदुस्थान-चीन व्यापारी संबंधांमधील तणावदेखील कमी होण्याची चिन्हे आहेत. चीनमधील सुमारे 45 कंपन्यांना हिंदुस्थानात व्यवसाय करण्याची मुभा दिली जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

थोडक्यात, कोरोनाच्या उद्रेकानंतर चिनी कंपन्या, त्यांचा हिंदुस्थानातील व्यवसाय, गुंतवणूक यासंबंधी मोदी सरकारने घेतलेली ताठर भूमिका सैल होणार असे दिसत आहे. राजकारण काय किंवा परराष्ट्र संबंध काय, परिस्थितीनुसार बदलत असतात. त्यातील कठोरपणा वेळेनुसार कमी-जास्त होत असतो.

Advertisement

मात्र तिकडे चीन सीमेवरील लष्करी तणाव कमी होणे आणि इकडे चिनी व्यापारासंबंधी कठोरपणा कमी होणे हा निव्वळ योगायोग मानायचा का? आठ महिन्यांपासून पूर्व लडाख सीमेवर हिंदुस्थान-चीन यांच्यातील लष्करी संघर्ष एका टोकाला गेला होता.

Advertisement

चिनी सैन्याने हिंदुस्थानात केलेली घुसखोरी, त्यावरून गलवान खोऱयात दोन्ही सैन्यांत झालेला रक्तरंजित संघर्ष, माघार घेण्याबाबत दोन्ही देशांची ताठर भूमिका या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या आठवडय़ात चीन आणि हिंदुस्थान यांच्यात ‘सामंजस्य’ करार होतो, दोन्ही सैन्य माघार घेतात, सीमेवरील तणाव निवळतो आणि इकडे हिंदुस्थान-चीन व्यापारात निर्माण झालेली कोंडीदेखील फुटण्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात.

Advertisement

सरकार भले हात झटकेल, पण सीमेवर चीन दोन घरे मागे गेला आणि इकडे हिंदुस्थानशी व्यापार-उद्योगात त्याला ‘चार घरे’ पुढे ‘चाल’ दिली असेच चित्र स्पष्टपणे दिसत आहे. परराष्ट्र संबंधात ‘दोन द्या, दोन घ्या’ असेच सुरू असते.

Advertisement

पण चीन हा आपला सगळय़ात बेभरवशाचा आणि धोकेबाज शेजारी आहे. आज व्यापारी स्वार्थासाठी सीमेवर नरमाई घेणारा चीन हेतू साध्य झाल्यावर सीमेवर पुन्हा कुरघोडय़ा करू शकतो.

Advertisement

तरीही तिकडे सीमेवर चीनला मागे रेटले म्हणून ‘जितं मया’ करायचे आणि इकडे हिंदुस्थान-चीन व्यापारी तणाव कसा कमी केला म्हणूनही टिऱया बडवायच्या, असा प्रकार सुरू आहे. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply