Take a fresh look at your lifestyle.

14 हजार कोटींच्या घोटाळ्यातील फरार आरोपी अखेर भारतात परतणार; वाचा, संपूर्ण प्रकरण थोडक्यात

मुंबई :

Advertisement

नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाला मंजूरी देण्यात आली आहे. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार डायमंड व्यापारी नीरव मोदीची याचिका लंडनच्या कोर्टाने गुरुवारी फेटाळली आहे. कोर्टाने त्यांच्या प्रत्यार्पणासंदर्भात भारताला मान्यता दिली आहे.

Advertisement

नीरव मोदीविरोधात (Nirav Modi) भारतात एक खटला चालू आहे, ज्याचे उत्तर त्याला द्यावे लागेल, असंही लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितलं. नीरव मोदी याच्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचणे, असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.

Advertisement

पंजाब नॅशनल बँकेला फसवल्याप्रकरणी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा आणि अंमलबजावणी संचलनालयाने दाखल केलाल मनी लाँड्रिंगचा गुन्हा या 2 गुन्ह्यांमुळे नीरव मोदी चर्चेत होता.

Advertisement

ब्रिटेनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. 14,000 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे.

Advertisement

2019 च्या मार्च महिन्यात नीरव मोदीला अटक झाली होती. तेव्हापासून ते वँड्सवर्थ तुरुंगात आहेत. कोरोनामुळे ते व्हीडिओ लिंकच्या माध्यमातून कोर्टात हजर होत आहेत. नीरव मोदी यांना मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये योग्य वैद्यकीय उपचार आणि मानसिक आरोग्य सेवा दिली जाणार आहे. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply