Take a fresh look at your lifestyle.

मंत्रालयाच्या ‘त्या’ मजल्यावरून पोलिसांवर दबाव; दरेकरांनी उपस्थित केला कळीचा प्रश्न

मुंबई :

Advertisement

सध्या राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर पुजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव या प्रकरणाशी जोडले गेले आहे. 15 दिवस लोकांपासून, माध्यमांपासून गायब असणारे संजय राठोड हे अखेर काल समोर आले. मात्र त्यांनी ‘पोलिटिकली करेक्ट’ भूमिका घेतली.

Advertisement

मात्र अद्यापही त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांची राळ थांबलेली नाही. अशातच आता या प्रकरणावरुन महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेतली. या प्रसंगी दरेकर यांच्या सोबत भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थित होत्या.          

Advertisement

यावेळी पोलीस महासंचालकांशी बोलताना राज्यातील विरोधी पक्षनेता म्हणून दरेकर यांनी १४ प्रश्न उपस्थित केले. पूजा चव्हाण प्रकरणाशी संबंधित या १४ प्रश्नांची उत्तरे मला आणि महाराष्ट्राला मिळणार का, असे त्यांनी विचारले. 

Advertisement

यात सर्वात महत्वाचा आणि कळीचा मानला जाणारा प्रश्न म्हणजे ‘मंत्रालयातील सहाव्या मजल्याच्या दबावामुळे पोलीस तपास प्रभावीत झाला आहे का?’, हा आहे.

Advertisement

इतर 13 प्रश्न :-

Advertisement
 1. दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ पासून आज म्हणजे २४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूजा चव्हाण घटनेशी संबंधित प्रमुख साक्षीदार अरुण राठोड बेपत्ता आहे. पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी काय करत आहेत?
 2. अरुण राठोड याला कोण बेपत्ता करू शकते, या संदर्भात काही व्यक्ती संशयाच्या फेऱ्यात आहेत. या व्यक्तींची पोलिसांनी आतापर्यंत चौकशी का केली नाही?
 3. अरुण राठोड याचे नातलग त्यांच्या गावातून बेपत्ता झाले आहेत. अरुण राठोड आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे काही बरेवाईट झाल्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबतचा तपास करण्यात पोलीस अद्याप यशस्वी झालेले नाही. पोलीस नेमके काय करत आहेत?
 4. अरुण राठोड याच्या गावातील घरात चोरी झाली. या प्रकरणाचा तपास केला आहे का?
 5. घटना घडून आणि ऑडिओ क्लिप उघड होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. पोलिसांनी या प्रकरणात कोणाची चौकशी केली, चौकशी केली की नाही, संशयितांच्या आवाजाशी क्लिपमधील आवाजांची पडताळणी करण्यासाठी आवाजाची फॉरेंसिक तपासणी अद्याप का झाली नाही?
 6. पूजा चव्हाणच्या कुटुंबातील सदस्य दबावाखाली दिसत आहेत. ते असुरक्षित असल्याचे लक्षात येत आहे. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा जयघोष करणारे महाराष्ट्र सरकार पूजा चव्हाणच्या कुटुंबातील सदस्यांना संरक्षण देणार का?
 7. अरुण राठोड आणि एक महिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी दाखल झाले होते. त्या महिलेच्या नावाची नोंद पूजा चव्हाण हिच्या नावाशी मिळतीजुळती आहे. पोलिसांनी या प्रकरणात काही तपास केला आहे का? या संदर्भात यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सीसीटीव्ही फूटेज तपासणे आवश्यक वाटते.
 8. व्हिडीओ क्लिपमध्ये ज्यांचा आवाज आहे , ज्यांच्याबाबत पूजाच्या नातलगांनी संशय व्यक्त केला आहे, त्या राज्य सरकारच्या मंत्र्याची चौकशी तातडीने करणे आवश्यक आहे. पण पोलिसांकडून या प्रकरणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले गेले?
 9. स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. जनसामान्य त्याचे पालन करतच आहेत. जर कोरोना विषयक जबाबदारी पाळली नाही तर लॉकडाऊन करू अशी धमकी मुख्यमंत्री देत आहेत. मुखपट्टी (मास्क) नसेल तर मुख्यमंत्री दंड वसुली करतात. अशा परिस्थितीत दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लपून बसलेले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री पोहरादेवी येथे शक्ती प्रदर्शन करतात. लाखोंचा जमाव जमवतात. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात, त्यांच्या विरोधात पोलिसांनी कोणता गुन्हा दाखल केला आहे का किंवा मुख्यमंत्री त्यांना कोणता दंड करणार?
 10. संशियत मंत्र्यापर्यंत पोलिसांना दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत पोहोचू दिले नाही. त्यांनी पुरावे नष्ट केले आहेत का?
 11. मंत्रीमंडळातील मंत्री दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ गायब होते. ते कुठे आहेत, का लपले आहेत, याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली आहे का, या चौकशीतून कळलेली माहिती जनतेला देणार का?
 12. पूजा चव्हाण प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यंत्री, राज्याचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक माध्यमांना का टाळत आहेत, जनतेला हवी असलेली माहिती का देत नाही?
 13. पूजा चव्हाण या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना वारंवार धमक्या येत आहेत. या मागचे कारण काय? विरोधी पक्षनेता म्हणून मला आणि महाराष्ट्रातील जनतेला या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राचे मुख्यंत्री, राज्याचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक देणार का?

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply