Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून बीडमध्ये निर्माण झाला अभूतपूर्व पेच; मुंडे, पंडित, आडसकर, धस यांनाही झटका..!

बीड / औरंगाबाद :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत चुरस बाजूला राहून मोठा पेच निर्माण झाला आहे. त्याला निमित्त ठरले आहे ते सहकाराच्या अनागोंदीचे. होय, योग्य सूचक-अनुमोदाकांच्या वणवा असल्याने आता या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज बाद झालेले आहे.

Advertisement

बँकेच्या 19 जागांसाठी ही निवडणूक होत असताना तब्बल अकरा जागेवर आता एकही उमेदवार पात्र न ठरल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे होणार किंवा नाही, हाच कळीचा मुद्दा बनला आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या बड्या राजकीय नेत्यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement

उमेदवारी अर्ज अपात्र झालेल्या यादीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू अभय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे लहान बंधू विजयसिंह पंडित, भाजप नेते रमेश आडसकर आणि माजी मंत्री व आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांच्या उमेदवारी अर्जाचा समावेश आहे.

Advertisement

जिल्हा बँकेवरती सध्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे. मात्र बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या बँकेसाठी मोठी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यची शेवटची तारीख असताना 19 जागेसाठी 214 अर्ज दाखल झाले होते. 

Advertisement

निवडणूक लढविण्यासाठी अ किंवा ब वर्ग ऑडिट रिपोर्ट हवा असतो. मात्र ज्यांनी अर्ज भरले त्या सोसायटीचा वर्ग हा क किंवा ड असल्याने सगळ्यांचे अर्ज बाद झाले आहेत. जिल्ह्यात 735 सेवा संस्थांपैकी अवघ्या 13 सेवा संस्था लेखा परिक्षणाच्या अ किंवा ब वर्गात आहेत. म्हणूनच जिल्हा बँकेच्या उपविधीतील या नियमाला स्थगिती द्यावी अशी याचिका सहकार मंत्र्यांसमोर करण्यात आली होती. बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात उमेदवारच नसले तरी बँका-पतसंस्था, पणन संस्था आणि इतर शेती या 3 मतदारसंघात मात्र चुरस राहणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply