Take a fresh look at your lifestyle.

घाईघाईत जेवण करताय; अन्न न चावता खाण्याचे भोगावे लागतील गंभीर परिणाम

ऑफिसला जाण्यापासून तर फिरायला जाण्यापर्यंत आपल्याला अनेक गोष्टींची घाई असते. अगदी दुपारचे जेवणही कामाचा लोड असल्याने लोक घाईघाईत करतात. घाईघाईत जेवण करण्याचे परिणाम म्हणजे आपण अन्न न चावता खातो. त्याचे अतिशय गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होत असतात.

Advertisement

आजवर आपण असे अनेक लोक किंवा लहान मुलेही पाहिले असतील, जे भात चावून खात नाहीत. भात लुसलुशीत किंवा चिकट झाल्यास न चावता खाल्ला जातो. पण लक्षात घ्या तुम्ही अन्न चावून नाही खाल्ले तर तुम्हाला आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागेल.

Advertisement

या दुष्परिणामांना जावे लागेल सामोरे :-

Advertisement

१) सगळ्यात आधी जो त्रास जाणवू लागेल तो आहे अपचनाचा. पोट सतत भरल्यासारखे वाटत असेल आणि तुम्हाला सतत ढेकर येत असतील तर समजून घ्या तुम्ही जेवण हळूहळू खावे आणि निट चावून खावे.

Advertisement

२) अन्न नीट चावले नाही तर ते पचण्यास जड होते. जर ते अन्न पचलेले नसेल तर ते पोटातून बाहेर जाण्यासही अडथळा निर्माण करते. बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला सातत्याने होत असेल तर तुम्ही तुमचे अन्न नीट चावत आहात की नाही याकडे लक्ष द्या.

Advertisement

३) पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पचनशक्ती चांगली राहणे गरजेचे असते. जर तुम्ही योग्य पद्धतीने अन्न ग्रहण केले नाही तर तुमच्या पचनशक्तीवर ताण येतो. एकदा पचनशक्तीवर ताण आला तर मात्र तुम्हाला ती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात

Advertisement

४) अन्न चावून खाण्याचे काही फायदे आहेत. अन्न चावल्यामुळे तुमच्या तोंडाचा व्यायाम होतो. दात मजबूत होण्यास मदत मिळते. शिवाय अन्न चावल्यामुळे तुमच्या कॅलरीजही वापरल्या जातात.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply