Take a fresh look at your lifestyle.

पोलिनेशनअभावी शेतकरी हवालदिल; मधमाशा नसल्याने बसलाय मोठा फटका

शेतीमध्ये महत्वाचा घटक असलेल्या मधमाशीकडे सध्या कोणाचेही लक्ष नाही. विविध कीटकनाशक फवारणी आणि मोबाईल टॉवरच्या लहरीमुळे सध्या मधमाशांची संख्या खूप कमी झालेली आहे. परिणामी शेतीचे उत्पादन आणि उत्पन्नात मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

फळबागा आणि कांदा बियाण्यांच्या पोलिनेशनअभावी सध्या अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. फळ आणि सर्वच पिकाच्या उत्पादनासाठी पोलिनेशन आवश्यक असते. फुलांमध्ये नर आणि मादी बीजांड यांचे संकर होण्याची ही महत्वाची क्रिया आहे. त्यासाठी फुलपाखरे आणि मधमाशा खूप महत्वाची भूमिका बजावतात. मात्र, आता तेच चक्र बाधित झालेले आहे.

Advertisement

पिकांचे मधमाशांअभावी पोलन (परागीकरण) होत नसून फुली पडण्याचे प्रमाण वाढले अाहे. परिणामी, उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मधमाशांचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये लागवड केलेल्या कांदाबीज पीक धोक्यात आले आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक सध्या जोमात आहे. मात्र कांद्यासाठी परागीकरणाचे काम हे मधमाशा करतात. मात्र या पिकावर मधमाशाच दिसत नाही. त्यामुळे बियाणे भरण्याऐवजी ते घटण्याचे प्रकार वाढले आहेत.

Advertisement

सध्या अनुदानावर मधमाशा पेटारे देण्याची कुठलीही योजना नाही. परंतु, पोखरा योजनेत असलेली गावांना मधमाशा पेटारे मिळू शकतात. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना भेटावे, तर कांदा सीड्स लागवड करताना या पिकामध्ये मोहरी किंवा गाजर लागवड करावी. 

Advertisement

शेतकरी या पिकाच्या बाजूने मधमाशा येण्यासाठी गूळ ओला करून टाकत आहे. तर कोणी मोठे कपडा घेऊन कांद्याची बोंडे एकमेकाला घासून पोलन करण्याचा प्रयत्न करीत आहे. 

Advertisement

शेतकऱ्यांनी जादा उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खत, विषारी औषधी फवारणीमुळे मधमाशांचे प्रमाण कमी झाले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आगेमोहळ किंवा साधे मोहळ दिसेनासे झाले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply