Take a fresh look at your lifestyle.

सरपंचाची कमाल, विरोधक केले बेहाल; पण ‘ती’ चूक आलीच अंगलट

सोलापूर :

Advertisement

विरोधकांना पद मिळू न देता आपल्याच हातात सत्ता ठेवण्याचा खेळ अवघ्या जगात त्याच कुरघोडीच्या पद्धतीने खेळला जातो. सोलापूर असो की कुठेही असेच खेळ रंगतात. काही यशस्वी होतात, तर काही अंगलट येतात. एका सरपंचाच्या हाच डाव अंगलट आलेला आहे.

Advertisement

ही घटना पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावात घडली आहे. विरोधी गटाला सरपंचपद मिळूच नये आणि हे जबाबदारीचे पद रिक्त राहावे, यासाठी रोपळेच्या माजी सरपंचाने मालमत्ता नोंदवही खाडाखोड केल्याचे हे प्रकरण आहे. त्यात त्यांनी विरोधी सदस्याने अतिक्रमण केल्याची नोंद थेट बोगस पद्धतीने केली आहे.

Advertisement

त्यामुळेच याप्रकरणी माजी सरपंच दिनकर कदम, शिपाई नितीन जाधव, लिपीक दशरथ कदम यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ग्रामसेवक कृष्णा हरी नवले यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement

सरपंचपदाचे आरक्षण हे अनुसूचित जमाती महिलेसाठी निघाले. अशावेळी निवडून आलेल्या विरोधी गटातील सदस्यांना हे पद मिळू न देण्याच्या उद्देशाने माजी सरपंचांनी हा गोंधळ घातल्याचे पुढे आले आहे.

Advertisement

एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, राजकारण करणात व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता यावर काय कार्यवाही होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply