Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर करोनाचे सावट; पहा काय असेल राजकीय शक्यता

सोलापूर / उस्मानाबाद :

Advertisement

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ मे २०२० मध्येच संपला आहे. परंतु, निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच कोरोनाचा कहर आल्याने सर्व प्रक्रिया आहे त्या पातळीवर स्थगित केली गेली. आताही पुन्हा एकदा दुसऱ्यांदा करोनाचे संकट फोफावत असल्याने निवडणूक होणार की नाही यावरही चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

अगोदरच या निवडणुकीत मुदतवाढ मिळाली आहे. इतर जिल्हा बँक निवडणुका होत आहेत किंवा झालेल्या आहेत. अशावेळी करोनाचे संकट वाढत असल्याने आता उस्मानाबाद जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार किंवा नाही, याचेच कोडे अनेकांना पडले आहे. लॉकडाऊन जाहीर न झाल्यास ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल अशीच शक्यता आहे.

Advertisement

सहकार निवडणूक प्राधिकरणाने दोनवेळा आदेश काढून सध्याच्या संचालक मंडळाच्या कारभाराला मुदतवाढ दिली. परंतु, डिसेंबर महिन्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत प्राथमिक आदेश सहकार विभागाने हळुहळु प्रक्रियेला गती दिली. सहकार विभागाने दि.१९ फेब्रुवारीपासून सोमवारपर्यंत (दि.२२) ज्या संस्था, सोसायटींचे मतदान प्रतिनिधी ठराव सादर करणे बाकी होते. त्यांचे ठराव जमा करून घेतले.

Advertisement

सहकारी बँकेचे ८९९ सभासद असल्याची माहीती यादीसह जिल्हा बँकेने जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केलेली होती. आता त्या ८९९ मतदार संस्था सभासदांनी आपल्या मतदार प्रतिनिधींचे ठराव दि.२२ फेब्रुवारी अखेर प्रत्येक तालुक्याला सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सादर करावयाचे होते. त्याचीही सोमवारी मुदत संपली आहे. आता या आलेल्या ठरावाची प्राथमिक यादी तयार करून ती दि.३ मार्चपूर्वी विभागीय निबंधकांकडे सादर केली जाणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply