Take a fresh look at your lifestyle.

शाळांना टप्पा अनुदानाबाबत शिक्षक आमदार आसगावकर यांनी सांगितलेय ‘हे’

सोलापूर :

Advertisement

मंगळवारी सोलापूर येथील मुख्याध्यापक भवनमध्ये नूतन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्याध्यापक, शिक्षकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत विविध मुख्याध्यापक, शिक्षकांनी उपस्थिती लावली.

Advertisement

आसगावकर यांनी म्हटले आहे की, शाळांमधील शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ती भीती दूर व्हावी. मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये संवाद साधावा. टप्पा अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही. शाळा, तुकड्यांसाठी टप्पा अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र काही शाळांना टप्पा अनुदानास पात्र असतानाही अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यावर आपण सगळे लढून मार्ग काढणार आहोत.

Advertisement

कोविडच्या अनुषंगाने शाळा स्वच्छता, निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती, वीज बिलासाठी शाळांकडे अर्थिक तरतूद नाही. तरी वेतनेतर अनुदान मिळावे. पुरवणी-फरक बिल, मेडिकल बिल दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. तसेच वेतन पथकास नियमित अधीक्षक मिळावा आदी मागण्या जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाकडून आमदारांना देण्यात आल्या.

Advertisement

तसेच २० टक्के अनुदान घेतलेल्या शाळा, तुकड्यांचा टप्पा वाढ व मूल्यांकनास १३ सप्टेंबर २०१९ पासून पात्र ठरवलेल्यांना अनुदान मिळावे. फेब्रुवारी २०२१ मध्ये काही शाळा व तुकड्यांना रोष्टर अद्ययावत नसल्याने आपत्र केले आहे. रोष्टर सध्या तपासून शाळा पात्र कराव्यात. शिक्षकेतर सुधारित आकृतिबंधानुसार पदांना मान्यता मिळावी, यासाठीही आग्रह धरण्यात आला.

Advertisement

मुख्याध्यापक धनाजी पावले म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झालोय. मार्च महिन्यातील २५ टक्के पगार मिळाला नाही. रजा रोखीकरणाचे एक लाख २२ हजारांचे बिलही प्रलंबित आहे. वारंवार वेतन विभागाकडे चकरा मारतोय. कोणीच दाद देत नाही. साहेब, आम्ही तुम्हाला मतदान करून निवडून दिले. आमची जबाबदारी पार पाडली. तुम्ही आता तुमचे शब्द पाळा. वेतन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यात याव्यात. आमच्या मागण्यांकडे लक्ष द्या.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply