Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ बँकेने शेतकऱ्यांसाठी आणली तडजोड योजना; पहा कसा घ्यायचा लाभ ते

सोलापूर :

Advertisement

नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतीचे नुकसान झाल्यावर अनेकदा शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. अशा शेतकऱ्यांना दिलासा देऊन अनुत्पादक कर्ज सुरळीत करण्याच्या उद्देशाने बँक ऑफ महाराष्ट्र यांनी एकरकमी तडजोड योजना जाहीर केली आहे.

Advertisement

या योजनेअंतर्गत संचित व्याज पूर्णपणे माफ केले जाणार असून, कर्ज बाकीवर आकर्षक सूट दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी गृह कर्ज, वाहन कर्ज इत्यादी घेतली आहेत, त्यावर देखील बँकेच्या नियमानुसार सूट दिली जाणार आहे. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूरच्या झोनच्या व्यवस्थापक सुनीता भोसले व हेमंत महाजन यांनी केले आहे.

Advertisement

बँक अॉफ महाराष्ट्रातर्फे नैसर्गिक आपत्ती व इतर बाह्य कारणांमुळे झालेले शेतीचे नुकसानीचा विचार करून शेतकऱ्यांसाठी एकरकमी तडजोड योजना आणली आहे. या योजनेनुसार ज्या शेतकरी कर्जदारांची शेती कर्ज दि. ३१ मार्च २०२० रोजी नैसर्गिक आपत्ती व इतर बाह्य कारणांमुळे अनुत्पादक झालेली आहेत व ज्यांच्याकडे १० लाखांपर्यंत कर्ज बाकी येणे आहे, अशी सर्व कर्ज खाती या योजनेसाठी पात्र आहेत.

Advertisement

कुठल्याही ओटीएस योजनेअंतर्गत लाभ घेतलेले कर्जदार साधारणत: त्या बँकेकडून पुनश्च घेण्यास अपात्र असतात. परंतु या विशेष ओटीएस योजनेअंतर्गत दहा लाखांपर्यंत कर्जबाकी असणारे सर्व शेतकरी पुन्हा बँक आॅफ महाराष्ट्रकडून कर्ज मिळवण्यास पात्र आहेत. हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply