Take a fresh look at your lifestyle.

सोसायट्या सक्रीय नसल्याने शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचणी; त्यामुळे होणार थेट कर्जवाटप

सोलापूर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँक भ्रष्टाचारयुक्त झाल्यावर जिल्ह्यातील अनेक गावाच्या सहकारी सोसायट्या बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा बँकेला कर्जाचे वाटप करण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील १२६५ साेसायट्यांपैकी ज्या निकषात बसणाऱ्या ३३४ साेसायट्या फ़क़्त सुस्थितीत आहेत. त्यामुळे सोलापूर बँकेने थेट शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

पाच वर्षांपासून बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याच्या कारणावरून बंद असेलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थेट कर्ज वाटप येत्या आठ दिवसांत सुरू करण्याचा निर्णय घेतला अाहे. थेट कर्ज बँकेमार्फत असल्याने शेतकऱ्यांना साेसायट्यांची अडचण येणार नाही. अातापर्यंत साेसायट्यांमार्फत जवळपास ६५ काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक शैलेश काेतमिरे यांनी दिली.

Advertisement

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील लोकनेते बाबूरावअण्णा पाटील सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी प्रशासक शैलेश कोतमिरे हाेते. सभेत त्यांनी शेतकऱ्यांना निर्णयांची माहिती दिली.

Advertisement

अातापर्यंत सर्व प्रकारे ६५ काेटी रुपयांचे कर्ज वाटप झाले अाहे. पण या साेसायट्या संपूर्ण जिल्ह्यात नसल्याने अचडणी येत हाेत्या. आता थेट कर्ज वाटपामुळे शेतकऱ्यांसमाेरील अडचणी दूर हाेणार अाहेत. असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply