Take a fresh look at your lifestyle.

बाबा रामदेव यांना झटका; ‘कोरोनील’बाबतच्या दाव्याबाबत पुढे आलीय ‘ती’ माहिती..!

पुणे :

Advertisement

सध्या जगभरात करोना विषाणूचा प्रकोप पुन्हा एकदा वाढला आहे. अशावेळी अनेक खासगी व्यक्ती आणि संस्थांनी आमच्याकडे करोना विषाणूवर रामबाण इलाज असल्याचे दावे केलेले आहेत. असाच एक दावा सुप्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने केला होता. मात्र, तो वास्तव नसल्याचे समोर आले आहे.

Advertisement

पतंजली आयुर्वेदने कोरोना संसर्ग प्रतिबंधाचे औषध बाजारात आणले आहे. ते औषध म्हणजे रामबाण इलाज असल्याची बतावणी केई जात आहे. अनेक सरकारी दवाखान्यातून हे औषध करोना रुग्णांनाही देण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र, यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार केंद्रीय आयुष मंत्रालयाने आमच्या औषधाला मान्यता दिल्याचा दावा पतंजलीने केला होता. मात्र काेराेनासाठी आम्ही कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिलेली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचआे) म्हटले आहे.

Advertisement

त्यातच ‘कोरोनिल’ औषधावर इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही या औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात बंदी घातली आहे. कोरोनिल औषधाच्या चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले आहेत.

Advertisement

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही या औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात बंदी घातली आहे. आरोग्य संस्थांकडून कोरोनिलचे प्रमाणीकरण झाल्याशिवाय राज्यात विक्रीस परवानगी मिळणार नाही.

Advertisement

बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने ‘कोरोनिल’ नावाचे औषध तयार केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हे औषध बाजारात आणण्यात आले. मात्र डाॅक्टरांची अधिकृत संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनने या औषधावर आक्षेप घेतला आहे. या औषधाला कोणत्याच अधिकृत संघटनेकडून मान्यता नाही.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply