Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. आलेत की अच्छे दिन; आमदारांच्यामार्फत असा होणार राज्याचा विकास..!

मुंबई :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन ही घोषणा आश्वासन न ठेवता थेट राजकीय केली. मात्र, केंद्रातील सत्ताधारी भाजपच्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने त्याला जास्त मनावर घेऊन कामाला धडाक्यात सुरुवात केली आहे. राज्यात आरोग्य आणि शिक्षणाचा बोजवारा उडालेला असतानाही ठाकरे सरकारने आमदारांना अच्छे दिनची अनुभूती दिली आहे.

Advertisement

आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटी रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला आहे. आमदारांच्या माध्यमातून स्थानिक विकासाला यामुळे ‘मोठी’ चालना मिळणार आहे. याचे सर्वपक्षीय आमदार आणि कार्यकर्त्यांनी दणक्यात स्वागत केले आहे.

Advertisement

महाराष्ट्रात विधान परिषदेचे ७८ आणि विधानसभेचे २८८ आमदार  आहेत. बांधकाम साहित्याच्या दारामध्ये मोठी वाढ झाली असतानाही आमदार निधीत वाढ होत नव्हती. अखेरीस तब्बल दहा वर्षांनी त्यात वाढ झालेली आहे. विकास निधीत वाढ करण्याची मागणी आमदार सातत्याने करत होते. त्यानुसार वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात आमदार निधीत एक कोटी वाढ करण्याची घोषणा झाली होती.

Advertisement

वाढीव निधी अजूनही प्राप्त झाला नव्हता. मंगळवारी नियोजन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. वाढीव निधीचा शासनाच्या तिजोरीवर ३६६ कोटींचा बोजा पडणार आहे. याआधी सन २०११-१२ पासून प्रतिवर्षी प्रत्येक आमदारास २ कोटी विकास निधी प्राप्त होत होता. आता तो ३ कोटी रुपये असा मिळणार आहे.

Advertisement

स्थानिक आमदार विकास निधीअंतर्गत लहान कामे केली जातात. त्यात वाढ झाल्याने मतदारसंघात अधिक संख्येने कामे करणे यापुढे शक्य होणार आहे. तसेच जुन्या योजनांच्या दुरुस्तीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply