Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेस स्वबळावर, तर महाविकास आघाडी इंडिकेटरवर; पहा काय झालीय राजकीय परिस्थिती ते

पुणे :

Advertisement

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी या नावाखाली एकत्रितपणे लढण्याची तयारी शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाने केली आहे. मात्र, या दोन दिग्गजांच्या मध्ये कचुंबर होण्याच्या भीतीने काँग्रेस आता स्वबळावर लढण्याच्या विचारात आहे. अशावेळी कॉंग्रेसला याचा फायदा होणार की थेट भाजपला याचा तिढा वाढणार असल्याने अवघी महाविकास आघाडीचे इंडिकेटर लागले आहेत.

Advertisement

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय शिवसेना व राष्ट्रवादी यांनी घेतला आहे. काँग्रेसने मात्र या निवडणुका स्वतंत्र लढण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मंगळवारी बैठक झाली. त्यामध्ये स्थानिक परिस्थिती पाहून आघाडी करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे.

Advertisement

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. पुढील दीड वर्षात राज्यात १० महापालिका, २७ जिल्हा परिषदा आणि ९७ नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकामध्ये पक्षाच्या धोरणावर या नेत्यांनी चर्चा करून धोरण ठरवले आहे.

Advertisement

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर सांगितले की, निक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. त्यामुळे आता आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला घ्यायचे किंवा नाही हे शिवसेना आणि राष्ट्रवादी ठरवतील.

Advertisement

या निर्णयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तसेही हे तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यास भाजपची स्पेस वाढणार आहेच. परंतु, हे जर दोन घटक म्हणून लढले तर मग भाजपला आणि शिवसेना-राष्ट्रवादीला याचा फटका बसणार की फायदा होणार, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Advertisement

संपादन :सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply