Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ राज्यात भाजपमध्ये फुट; भाजपला अंतर्गत राजकारणाचा ‘असा’ बसणार फटका

दिल्ली :

Advertisement

राजस्थानमध्ये भाजपने विविध मार्गाने अनेक प्रयत्न करूनही गहलोत यांनी भाजपाच्या हाती भोपळा दिला आहे. आता राजस्थान भाजप आधीच परभवाच्या छायेत असताना एक मोठी बातमी समोर आलेली आहे.

Advertisement

राजस्थान भाजपमध्ये फुट पडली असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आलेले आहे. पक्षात दोन गट तयार झाले असून यातील एक गट हा माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे समर्थकांचा आहे.  वसुंधरा राजे आणि राजस्थान भाजपचे अध्यक्ष सतीश पुनिया यांच्यात वाद निर्माण झाला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

Advertisement

पुनिया हे वसुंधरा राजेंच्या समर्थक आमदारांना सातत्याने डावलत असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून वसुंधरा राजे या भाजपमध्ये नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या भाजपच्या अनेक बैठकांना उपस्थित राहिलेल्या नाहीत.

Advertisement

गेल्याच महिन्यात पुनिया यांनी एक विधान केलं होतं, जे वसुंधरा समर्थकांना झोंबलं होतं. पुनिया म्हणाले होते की आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल हे सोशल मीडिया ठरवू शकत नाही.

Advertisement

भाजपच्या या अंतर्गत राजकारणाचा भाजपला मोठा फटका बसणार आहे. कारण भाजप आपल्या एकीच्या गुणामुळे आजवर अनेक ठिकाणी सत्ता प्रस्थापित करू शकला. काँग्रेस ज्या गोष्टीमुळे मागे पडली तीच गोष्ट भाजपमध्ये घडणार असेल तर भाजपचीही भविष्यात पीछेहाट झालेली दिसू शकते.   

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply