Take a fresh look at your lifestyle.

असाही बसला इंधनदरवाढीचा फटका; नगरच्या नववधूची थेट बैलगाडीने रवानगी, वाचा संपूर्ण विषय थोडक्यात

अहमदनगर :  

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. लॉकडाउन लागल्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सुरू झालेली वाढ अजूनही थांबलेली नाही. सध्याची परिस्थिती बघता, देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलदर 100 रुपये प्रती लीटरला टेकलेले आहेत.

Advertisement

याचाच फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. आधीच महागाईने नको नको केले असताना वाढलेले इंधन दरामुळे आता गाडी वापरायला नकोसे झालेले आहे. याचाच प्रत्यय नगरमधील एका लग्नात आला.

Advertisement

सर्वसाधारणपणे लग्न म्हटले की, चारचाकी आलीच, नवरीची विदाई हा मोठा रडण्याचा आणि सामूहिक इव्हेंट असतो. चारचाकी नसली, तर कमीपणा समजला जातो, अशी परिस्थिती सध्या ग्रामीण भागातही आहे. असे असताना आता इंधनदरवाढीचा फटका बसल्याने आणि संगमनेर तालुक्यात चारचाकीला फाटा देत खांडगावमध्ये नववधुला बैलगाडीतून वाजतगाजत सासरी नेण्यात आले.

Advertisement

या लग्नाची सध्या जोरदार चर्चा तालुक्यात आणि जिल्ह्यात रंगली आहे.  इंधनाच्या खर्चाला फाटा देत दरवाढीच्या परिणामाचा संदेश या माध्यमातून समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न साकुरे परिवाराने केली आणि तो यशस्वी झाल्याची चर्चा विवाहप्रसंगी सुरु होती. 

Advertisement

खांडेश्वर मंगल कार्यालयात रविवारी साहेबराव साकुरे यांचा मुलगा सतीश व निमगावपाग्याचे बाबासाहेब कानवडे यांची कन्या कोमल यांचा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे दोन्ही कुटुंबांनी काटेकोर पालन केले. या दोन्ही परिवारांनी उचललेले पाऊल हे महत्वाचे आहे. बैलगाडीतून वाजतगाजत सासरी गेलेल्या नववधूचेही कौतुक करावे तेवढे कमीच…      

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply