मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे.
याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र आता आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.
23 फेब्रुवारीला दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 337 रुपयांनी वाढून 46,372 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. सोन्याच्या भावात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेत रात्रीत होणारी वाढ आहे. सोमवारी व्यापार सत्रात सोन्याचा दर 46,035 रुपयांवर बंद झाला.
सराफा बाजारात सोन्यासह चांदीच्या भावातही तेजी नोंदवली गेली आहे. चांदीचे दर 1,149 रुपयांनी वाढून 69,667 रुपये प्रति किलो झाले. सोमवारी सत्रात चांदी 68,518 रुपये प्रतिकिलो होती.
एचडीएफसीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांचे म्हणणे आहे की, जागतिक बाजारपेठेतील रात्रभर झालेल्या तेजीचा परिणाम दिल्लीच्या स्पॉट मार्केटमधील 24 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये दिसून आला. सोन्याचे दर दहा ग्रॅम 337 रुपयांनी महाग झाले.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक