‘त्याच्या’मुळे एकाच वेळी 300 गाड्यांनी बुडवला टोल; खंडणीचा गुन्हा दाखल, वाचा, काय होती घटना
मुंबई :
अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खुनातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुविख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणे याची सोमवारी तळोजा कारागृहातून मुक्तता झाली. विशेष म्हणजे गजा मारणेच्या मुक्ततेनंतर थेट तळोजा करागृहापासून त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली.
तळोजा ते पिंपरी-चिंचवडपर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. या सगळ्या गाड्यांनी उर्से टोलनाक्यावर टोल भरला नव्हता. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत सर्व वाहने पुढे नेली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
कारागृहातून बाहेर पडतानाच पुन्हा गजा मारणेने दहशतीची झलक दाखवली आणि गजाच्या समर्थकांनी मुंबई आणि पुणे जिल्हा ग्रामीण आणि शहराच्या पोलिसांना आव्हान देत तब्बल तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या घेऊन सव्वाशे किलोमीटर मिरवणूक काढली.
आता पोलिसांकडून गजा मारणे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
कशी झाली गजा मारणेची सुटका :-
दहशतीच्या जोरावर सीसीटीव्हीसारखे पुरावे असताना ही पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात एकही साक्षीदार खटल्याच्या सुनावणीदरम्यान पोलीस जमवू शकलेले नाहीत आणि या सगळ्यातून सबळ पुराव्याअभावी गजा मारणेची निर्दोष मुक्तता झाली.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून अदानी-अंबानींच्या संपत्तीत इतकी दमदार वाढ; पहा कोण आहे आघाडीवर..!
- म्हणून औरंगाबादेत निर्माण झाला तणाव; शिवसेनेचे नेते माजी आमदार झाले झटक्यात फरार..!
- MG ने दिल्या 5 रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स; गडकरींच्या हस्ते सेवेला सुरुवात
- म्हणून सोयाबीन खातेय भाव; पहा कुठे कितीवर स्थिरावलेत मार्केट रेट
- हरबऱ्यामध्ये तेजी, मात्र मिळेना हमीभाव; पहा राज्यभरात कुठे, किती मिळतोय बाजारभाव