Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ गावात तब्बल 155 लोकांना झाली एकाच वेळी लागण; वाचा, कुठे आणि कशी घडली घटना

मुंबई :

Advertisement

करोनाचा दुसरा स्ट्रेन अत्यंत जोराने वाढत चालला आहे. करोणा व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. करोनाचे रुग्ण वाढत आहेत. सरकार नागरिकांना करोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहे. 

Advertisement

अशातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक गावात तब्बल155 लोकांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाली आहे. बुलडाण्यातील  जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथे हा प्रकार घडला. या गावात आता प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Advertisement

कशी झाली एवढ्या लोकांना लागण :-

Advertisement

झाडेगावात सात दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याच्या नियमाला फाटा देत हा कार्यक्रम पार पडला.

Advertisement

विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाला बाहेर गावच्या लोकांनीही मोठी प्रमाणात हजेरी लावली होती. ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 155 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे झाडेगावला आता कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement

एकाचवेळी इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासन हादरले आहे. गावात आरोग्य, पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरु आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply