Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : तब्बल 7 वेळा खासदार राहिलेल्या ‘त्या’ बड्या नेत्याची मुंबईत आत्महत्या; सुसाईट नोटमध्ये ‘त्या’ अधिकारी आणि मंत्र्यांची नावे

मुंबई :

Advertisement

सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकीय पटलावर अनेक धक्कादायक गोष्टी घडताना दिसत आहेत. अशातच राजकीय वर्तुळातून अजून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर आत्महत्या केल्याचे समजत आहे.

Advertisement

दादरा आणि नगर हवेली (दादरा नगरहवेली) खासदार मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आलेआहे. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. सात वेळा खासदार असलेले डेलकर यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र पोलिस घटनास्थळी हजर आहेत आणि या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisement

मोहन देलकर हे दमण आणि दीव या लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून काम करणारे स्वतंत्र राजकारणी होते. डेलकर हे मुंबईतील ग्रीन साऊथ हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर थांबले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चालकाने फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र तो झाला नाही म्हणून त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल कळवलं.

Advertisement

कुटुंबियांनीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, अखेर पोलिसांना कळवण्यात आले, त्यानंतर त्यांच्या चालकाने शेजारच्या रुममधील गॅलरीतून त्यांच्या गॅलरीत उडी मारल्यानंतर डेलकर यांनी गळफास घेतल्याचं समोर आलं.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक बड्या अधिकार्‍यांची आणि मंत्र्यांची नावे आहेत. ही नावे अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र या नावांचा डेलकर यांच्या आत्महत्येशी थेट संबंध असण्याची शक्यता आहे.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply