Take a fresh look at your lifestyle.

रामदेव बाबांना ठाकरे सरकारचा दणका; ‘त्यावर’ घातली बंदी

मुंबई :

Advertisement

करोना विषाणूवर १०० टक्के प्रभावी औषध असल्याचा दावा करून पतंजली कंपनीने कोरोनील नावाचे औषध बाजारात आणले होते. मात्र, त्यावरून मोठा गहजब उडाला होता. कोणत्याही क्लिनिकल ट्रायल न घेताच असे औषध १०० टक्के प्रभावी असल्याच्या मुद्याची दखल घेऊन देशभरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

Advertisement

आता पुन्हा एकदा एक नवीन ‘कोरोनिल टॅबलेट’ औषध लॉन्च करत रामदेव बाबांनी एक अजब दावा केला आहे. पतंजली योगपीठाचे रामदेव बाबा यांनी कोविड-१९ वर पुन्हा एक नवं औषध लॉन्च केलं आहे. शुक्रवारी (१९ फेब्रुवारी २०२१) एका पत्रकार परिषदेत रामदेव बाबा यांनी हे औषध लॉन्च केलं.

Advertisement

यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते. याच दरम्यान बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर रुग्ण 3 दिवसांत बरा होतो असा देखील दावा केला आहे.

Advertisement

मात्र आता ठाकरे सरकारने रामदेव बाबांच्या पतंजलीला झटका दिला आहे. अधिकृत मान्यतेशिवाय राज्यात कोरोनील विक्रीला मनाई करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) या औषधाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सडेतोड भूमिका मांडली आहे. 

Advertisement

देशमुख म्हणाले की, पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर ‘आयएमए’ने प्रश्न उपस्थित केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सुद्धा हे औषध करोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणं आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply