Take a fresh look at your lifestyle.

आता ‘त्यापासून’ बनणार इंधन, पेट्रोल-डिझेलची नाही भासणार गरज

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. लॉकडाउनमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सर्वसामान्य लोकांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. अशातच वाढणारे इंधनाचे दर तसेच गॅसचे दर पाहता, सामान्य लोकांना महागाईने नको नको केले आहे. अशातच आता पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून गाईच्या शेणापासून इंधन तयार करण्याचा सल्ला राष्ट्रीय कामधेनू आयोगाने दिला आहे. 

Advertisement

कामधेनू आयोगाने म्हटले आहे की, इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गायीच्या शेणापासून बनलेल्या नॅच्युरल गॅस CNG चा उपयोग करण्याचा उपाय सुचवत गायीच्या शेणापासून बनणारा गॅस स्वस्त आणि मेड इन इंडिया आहे.

Advertisement

जागतिक पातळीवरील उद्योजकांच्या नव्या-जुन्या कल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर करून गायीच्या शेणापासून इंधन तयार करण्याच्या शक्यतांवर काम सुरू केल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले.

Advertisement

दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या चढत्या दरामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आलेला असताना रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्र सरकारला इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या एमपीसी बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी राज्य आणि केंद्र सरकारला इंधनावरील कर कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचा सल्ला दिला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply