Take a fresh look at your lifestyle.

‘ते मला माहिती नाही’ म्हणत मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केली भूमिका; वाचा, नेमकं काय म्हणालेत ते

मुंबई :

Advertisement

सध्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाला राजकीय वळण लाभलं आहे. यावरुन राज्याच्या राजकाणातही खळबळ माजली आहे. पुजाच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांचे नाव जोडले जात आहे, ते वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड आज लोकांच्या समोर आलेले आहेत.

Advertisement

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकारणापासून मंत्री संजय राठोड हे मुंबईत होते. आज राठोड हे पोहरादेवी मंदिरात आले. पोहरादेवी गडावर जाऊन राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, यावेळी मोठ्या प्रमाणात राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी केली होती.

Advertisement

आज अखेर राठोड यांनी माध्यमांना आपली भूमिका सांगितली आहे. कथित व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपविषयी आणि अरुण राठोडविषयी बोलताना ते म्हणाले की, अरूण राठोड कोण मला माहिती नाही, सोशल मीडियात जे काही फोटो व्हायरल होत आहेत, माझ्यासोबत अनेक लोक फोटो काढतात, सर्वांना सोबत घेऊन मी काम केलं आहे, एका घटनेने मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे.

Advertisement

पुढे ते म्हणाले की, मागील १५ दिवसांपासून माझं काम सुरूच होतं, माझ्याबद्दल टीव्हीवरचं प्रेम पाहत होतो, या दिवसात शासकीय काम मुंबईच्या बंगल्यातून सुरू होतं, माझ्या कुटुंबातील आई-वडिल, पत्नी, मुला-बाळांना धीर देत होतो, त्यांना सांभाळण्याचं काम केलं, आज या पवित्र भूमीत येऊन पुन्हा मी माझ्या कामाला सुरूवात करणार आहे. पोलीस चौकशी सुरू आहे, या तपासातून सत्य बाहेर येईल.  

Advertisement

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, , या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तपासाचे आदेश दिलेत, या चौकशीत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, पण माझी बदनामी करण्यासाठी घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply