करेक्ट कार्यक्रम : राष्ट्रवादीच्या पाटलांचा भाजपच्या पाटलांना झटका; ‘त्या’ महापालिकेत सत्तापालट
सांगली :
टप्प्यात आला की कार्यक्रम करण्याची म्हण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा खरी करून दाखवली आहे. भाजपला चारीमुंड्या चित करत सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापालट करण्यातराष्ट्रवादीला यश आलं आहे.
78 पैकी तब्बल 41 जागा भाजपकडे असतानाही महापौरपद मात्र राष्ट्रवादीकडे आले. भाजपमध्ये झालेल्या अंतर्गत वादाचा हा परिणाम असण्याची शक्यता आहे. परवादिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र्कांत पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत वाद झाल्याची माहिती सूत्रांनी सांगितली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
महापौर, उपमहापौर निवडीवरुन भाजपमध्ये कुरबुरी सुरु होत्या. याचाच फायदा घेत राष्ट्रवादीने करेक्ट कार्यक्रम केला आणि भाजपच्या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला. या नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू केले. या करेक्ट कार्यक्रमात ‘मनी पॉवर’चाही उपयोग झाल्याचे समजत आहे.
महापालिकेतील पक्षांचे बलाबल :-
- भाजप – 41
- अपक्ष – 2
- काँग्रेस – 20
- राष्ट्रवादी – 15
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य