नगर जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी ‘त्या’ तिघांमध्ये होणार रेस; उपाध्यक्षपद थोरात गटाच्या ‘त्या’ उमेदवाराकडे
अहमदनगर :
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बदलत्या राजकीय परिस्थितीत नगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक राज्यस्तरावर गाजली होती. नगर जिल्हा बँकेच्या निवडणूकीचे निकाल लागलेले आहेत. भाजपकडे 7 तर महाविकास आघाडीकडे 14 संचालक आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सूत्रे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे होती. तर भाजपकडून विखे गटाची एकाकी झुंज होती. यात शिवसेनेकडे फक्त एकच संचालकपद आलेले आहे. तेही मंत्री शंकरराव गडाख यांच्या रूपाने.
महाविकास आघाडीतही सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीचा बदला घेण्यात असंतुष्ट नेते यशस्वी झाल्याचेही मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ९, भाजप ७, काँग्रेस ४ आणि शिवसेना १ असे उमेदवार निवडून आले आहेत
आता बँकेच्या निवडणुकीचे निकाल समोर आले असल्याने संचालकपदी कोण कोण विराजमान होणार हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरीही नगर जिल्हा हा सो-धा म्हणजेच सोयर्या-धायर्याच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी कोण कशीही फिल्डिंग लावू शकतो.
अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद थोरात गटाकडे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आमदार आशुतोष काळे, तर उपाध्यक्षपदासाठी माधवराव कानवडे यांच्या नावाची चर्चा आहे. सुरुवातीला पक्षीय पातळीवर निवडणुकीची चिन्हे असताना, नंतर मात्र सहमती एक्स्प्रेस धावली. त्यातून तब्बल 17 जागा बिनविरोध झाल्या.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य