‘त्या’ माजी खासदारावर गुन्हा दाखल; शरद पवार, फडणवीसांच्या उपस्थितीत घडली होती ‘ती’ घटना
पुणे :
राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा आपले हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे.यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीत काळजी घेण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. लग्न, सोहळे, कार्यक्रम यावर अनेक निर्बंध लावण्यात आलेले आहेत.
अशातच आता एका खासदाराच्या मुलाच्या लग्नाचा शाही सोहळा शासकीय नियमांचा फज्जा उडवत पार पडला. विशेष बाब म्हणजे या लग्नाला राज्याचे अनेक बडे नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्समध्ये पार पडललेल्या या विवाह सोहळ्यास तुफान गर्दी झाली होती. कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे ज्येष्ठ सुपुत्र पृथ्वीराज महाडिक यांचा रविवारी (दि. २१ फेब्रुवारी) रोजी शाही पद्धतीने विवाह संपन्न झाला.
एकीकडे कोरोना वेगाने वाढत असताना जनसामन्यांच्या कार्यक्रमांवर कडक निर्बंध आले असताना परवानगी पेक्षा जास्त लोक या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले होते.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने हे निर्बंध अधिकच कठोर करण्यात आलेले आहेत. शिवाय पुणे जिल्ह्यासाठी आणखीही प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आलेले आहेत.
या पार्श्वभूमीवर महाडिक यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग, वऱ्हाडींची संख्या यासह अनेक नियम मोडले गेल्याने पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले आहे. महाडिक यांच्या मुलाच्या लग्नाला हजार ते बाराशे वऱ्हाडी उपस्थित होते. या शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेले नाहीत.
त्याच आधारावर पोलिसांनी विविध कलमांतर्गत महाडिक यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर यांचाही समावेश आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य