Take a fresh look at your lifestyle.

केंद्र सरकारमुळे मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला बसणार झटका; वाचा, काय घडला प्रकार

दिल्ली :

Advertisement

भारत-चीन तनाव सध्या निवळला असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून दोन्ही देशातील संबंध ताणलेले होते. भारताने तब्बल 2 वेळा सर्जिकल स्ट्राईक करत चीनला नमवले होते. तसेच चीनी कंपन्यांसोबत असणारे अनेक व्यापारी करारही रद्द केले होते.  

Advertisement

व्यापारात मोठे नुकसान झाल्याने चीनने अखेर माघार घेतली असल्याचे समजत आहे. भारतानेही मोठे मन करत ‘हिंदी-चीनी भाई-भाई’चा संदेश दिला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वदेशी मोहिमेला झटका बसण्याची शक्यता आहे.

Advertisement

आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत माल विक्री आणि गुंतवणूक करण्यासाठी चीनी कंपन्यांनी भारत सरकारला प्रस्ताव पाठवले आहेत. चिनी कंपन्यांचे थेट परकीय गुंतवणुकीचे प्रस्ताव मंजूर करण्यास सुरुवात केली आहे.     

Advertisement

दूरसंचार आणि विमा क्षेत्रात ज्या प्रमाणे परकीय गुंतवणूक प्रस्तावांची छाननी केली जाते तशीच पध्द्त सध्या चीनमधील येणाऱ्या गुंतवणूक प्रस्तावांबाबत वापरली जात आहे.  गेल्या काही वर्षात चिनी कंपन्यांनी टेक्नाॅलाॅजी आणि डिजिटल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

Advertisement

या व्यापारासाठी केंद्र सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply