Take a fresh look at your lifestyle.

संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ; आता ‘त्यांनीच’ दिलेत चौकशीला समोर जाण्याचे आदेश

वाशिम :

Advertisement

सध्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाला राजकीय वळण लाभलं आहे. यावरुन राज्याच्या राजकाणातही खळबळ माजली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर ज्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. 

Advertisement

पुजाच्या आत्महत्येपासून मंत्री संजय राठोड हे मुंबईत होते. आज राठोड हे पोहरादेवी मंदिरात येणार आहेत. सकाळी साधारण साडे अकरा वाजताच्या सुमारास संजय राठोड पोहरादेवीला येतील, अशी माहिती आहे. मात्र त्यापूर्वीच त्यांना एक मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

आजवर पोहरादेवी धर्मपीठाने मंत्री राठोड यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. महंत जितेंद्र महाराज व सुनील महाराज यांच्या भूमिका या सातत्याने राठोड यांच्या समर्थनार्थ होत्या. मात्र आज महंत जितेंद्र महाराज यांनी मोठे विधान केले आहे. ‘

Advertisement

एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सांगितले की, पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत आम्ही सर्व संत महंतांनी शोक व्यक्त केला आहे. याबाबत सखोल चौकशी केली जावी, जेणेकरुन सत्य बाहेर येईल. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, चौकशीअंती जे सत्य बाहेर येईल ते आम्हाला मान्य असेल.

Advertisement

महंत जितेंद्र महाराज यांच्या या भूमिकेमुळे आता राठोड यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे समजत आहे. संजय राठोड यांना पोहरादेवी पिठानं चौकशीला सामोरं जाण्याच्या सूचना केल्या आहेत. 

Advertisement

संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे :

Advertisement

1. संजय राठोड हे सकाळी साधारण 9 वाजता आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवीकडे जाण्यास निघतील.
2. सकाळी 11.30 वाजता ते पोहरागड येथे पोहचतील.
3. दुपारी एक वाजता संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे जाण्यासाठी निघतील.
4. दुपारी 2.30 च्या सुमारास संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानात पोहोचतील.
5. दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. याठिकाणी कोरोना प्रसार रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा ते आढावा घेतील.
6. यानंतर संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाच्या दिशेने रवाना होतील.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply