Take a fresh look at your lifestyle.

भाजप ‘या’ बड्या नेत्याकडून राष्ट्रवादीला पुरवली जातेय रसद; राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण थोडक्यात

मुंबई :

Advertisement

राष्ट्रवादी हा सोयिस्कर राजकीय भूमिका घेऊन चालणार पक्ष आहे, असा आरोप वेळोवेळी विविध पक्षांनी केला आहे. मात्र आता एका मोठ्या घटनेवरून हे सिद्ध होताना दिसत आहे. राष्ट्रवादीला चक्क भाजप नेत्याकडून देणगी पुरवली जात असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

मुंबई भाजपचे प्रमुख मंगल प्रभात लोढा यांनी तब्बल 5 कोटी रुपयांची देणगी राष्ट्रवादीला देणगी स्वरुपात दिले असल्याची घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे मागच्या वर्षी राष्ट्रवादी पक्षाला एकूण 12 कोटीची देणगी मिळाली होती. म्हणजे जवळपास निम्मी देणगी ही लोढा यांच्याकडून मिळाली असल्याचे समजते.

Advertisement

दरम्यान या देणगी प्रकरणाविषयी बोलताना मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, कंपनी माझ्या मालकीची आहे पण मी प्रत्यक्षरित्या ती सांभाळत नसून कंपनीच्या कार्यालयात याबाबत विचारण्याचं सांगण्यात आलं आहे. 

Advertisement

या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2019-2020 या वर्षात तब्बल 59.94 कोटी रूपये देणगी मिळाली आहे. मागच्या वर्षी पक्षाला 12.05 कोटी देणगी मिळाली होती. म्हणजेच सत्तेत आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देणगीत तब्बल 5 पटींनी वाढ झाली आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply