‘राजकारण करायला उभा जन्म पडलाय’ म्हणत शिवसेनेने भाजपला दिला सल्ला; वाचा, नेमकं काय म्हटलं आहे त्यांनी
मुंबई :
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज कोरोनावरून विरोधी पक्ष चुकीचा वागत असल्याचे सांगितले आहे. तसेच काही प्रश्न उपस्थित करत टीकाही करण्यात आलेली आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-
आज लॉक डाऊन किंवा कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडले आहे तसेच कंबरडे नोटाबंदी पर्वातही मोडलेच होते. त्या मोडकळीतून देश अद्यापि उभा राहिलेला नाही. कोरोना संकटात तर लोकांच्या जीविताचे रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
त्यामुळे विरोधी पक्ष काय बोलेल याची फिकीर न करता मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नाशिक-पुण्यासारख्या शहरांत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रमुख देवळांनाही कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागत आहे.
आंदोलने, मोर्चे काढू नयेत असे बजाविण्यात आले आहे. लोकल ट्रेन सुरू झाल्या. त्यात मास्क न घालता प्रवासी चढतात. मधल्या काळात शहाण्यासुरत्या लोकांनी भव्य स्वरूपात लग्न समारंभ केले. तेथेही शिस्त मोडण्यात आली. शिस्त मोडण्यात सर्वपक्षीय प्रमुख लोक होते.
त्यामुळे जनतेला तरी काय आदेश द्यावेत? कोरोना कुणालाही सोडत नाही. त्यामुळेच त्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही गाठले. राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळांनाही कोरोनाने गाठले. देशभरात मागील 24 तासांत 14 हजार 199 तर महाराष्ट्रात 6 हजार 971 कोरोना रुग्ण आढळले. ही वाढ देशात 31 टक्के तर महाराष्ट्रात तब्बल 81 टक्के एवढी मोठी आहे.
म्हणूनच ही चिंतेची गोष्ट आहे. हे असेच सुरू राहिले आणि ‘कोरोना’चा धुमाकूळ पुन्हा सुरू झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. नव्हे, ती आता जाताना दिसत आहे. ‘एम्स’सारख्या सर्वोच्च वैद्यकीय संस्थांनी धोक्याची जाणीव करून दिली.
‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, हे महाराष्ट्रातील विरोधकांनी समजून घेतले पाहिजे. पुन्हा लॉक डाऊन टाळायचा असेल तर लोकांनी जबाबदारीने वागावे. विरोधी पक्षांनीही जबाबदारीचे भान राखावे. विरोधकांनो, निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागा, बोला. राजकारण करायला उभा जन्म पडला आहे, पण कोरोनाने संधी दिली तर! तेव्हा काळजी घ्या!!
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर