राज्यातील विरोधी पक्ष हा काही पाकिस्तानी किंवा ‘त्या’ वंशाचा नाही; शिवसेनेचा जहरी टोला
मुंबई :
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज कोरोनावरून विरोधी पक्ष चुकीचा वागत असल्याचे सांगितले आहे. तसेच काही प्रश्न उपस्थित करत टीकाही करण्यात आलेली आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-
कोरोना संसर्गाबाबत सत्यस्थिती समोर मांडणे याला काय दहशत पसरवणे म्हणायचे? महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याची माहिती ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे.
या नव्या स्ट्रेनमुळे ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवणे आणखी कठीण असल्याची भीती डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केली. यापूर्वी कोरोनाच्या अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा केरोनाचे संक्रमण होण्याचा धोका असल्याचे डॉ. गुलेरिया सांगत आहेत.
कोरोनावरील लस ही नव्या स्ट्रेनविरोधात पुचकामी आहे हे जे डॉ. गुलेरिया तळमळीने सांगत आहेत, तो काय दहशत माजविण्याचा प्रकार आहे? ‘एम्स’चे संचालक देशाला गुमराह करीत आहेत, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन ‘एम्स’च्या दारात जोरदार आंदोलन केले पाहिजे.
देशाचे आरोग्यमंत्रीच काय, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे उंबरठे झिजवून निषेधाची पत्रे दिली पाहिजेत. पण मुख्यमंत्री बोलत आहेत, लोकांना धोका समजावून सांगत आहेत म्हणून टीका करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह करणे किंवा त्यांना कोरोनाच्या खाईत लोटण्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्याचे स्वागत विरोधकांनी का करू नये? जनता जेवढी सत्ताधारी पक्षाची असते तेवढी ती विरोधी पक्षांचीसुद्धा आहे. लॉक डाऊनमुळे लहान व्यापारी, नोकरदार वर्ग, हातावर पोट आहे अशांचे कंबरडे मोडणार हे नक्की.
आर्थिक व्यवस्थाही कोसळणार आहेच. त्यासाठी मार्ग काढावा लागेल व पेंद्राने त्याकामी मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला या कामी पेंद्राकडून एखादे विशेष आर्थिक पॅकेज मिळायला हवे. असे आर्थिक पॅकेज मिळावे म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनीही मोदी यांच्याकडे तगादा लावला तरी आमची हरकत नाही.
राज्यातील विरोधी पक्ष हा काही पाकिस्तानी किंवा अफगाणी वंशाचा नाही. तो याच मातीतला आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा, देवेंद्र फडणवीस, दरेकर, आशिष शेलार वगैरे मंडळींनी दिल्लीतच ठाण मांडून बसावे व राज्याच्या वतीने एक-दोन हजार कोटींच्या पॅकेजसाठी लढत राहावे. राज्यातून देशाला जो मोठा महसूल मिळतो, त्यातला पुरेसा परतावा महाराष्ट्राला मिळाला तर विरोधी पक्षाला सरकारकडून जे करून घ्यायचे आहे, त्याचा मार्ग मोकळा होईल.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- शक्तीप्रदर्शनानंतर फुटला कोविड बॉम्ब; पोहरादेवी महंतांसह आठजण करोनाबाधित
- मोदी तर ‘त्यांच्यापेक्षा’ महान, छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर ‘तेव्हा’ झालाच होता; शिवसेनेने भाजपला करून दिली आठवण
- धक्कादायक : अंबानींच्या घराजवळ जिलेटिनवाली कार; पोलिसांचा तपास सुरू
- शिवसेनेचा शालजोडीतून टोला; मोदी हे फकीर आहेत व कधीही ‘झोला’ उचलून…
- ‘ती’ तर अंधभक्तांची पुढची पायरी; वाचा, मोदीभक्तांवर राऊतांनी का साधला निशाणा