मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये होणारी ही वाढ पाहता देशातील अनेक शहरांत शंभरी गाठली आहे. 12 दिवस सलग इंधन दरवाढ झाल्यानंतर दरवाढ थांबली होती.
आता दोन दिवस विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा झटका दिला आहे. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल ३५ पैशांनी महागले आहे.
रविवारी आणि सोमवारी किंमती थोड्या स्थिरावल्या असल्यामुळे ग्राहकांना दिलासा होता. मात्र, आज पुन्हा इंधन दरवाढ झाल्याचे पाहायला मिळाले. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडने ६५ डाॅलरची पातळी ओलांडली आहे. अमेरिकेतील हिमवादळाने तेथील कच्च्या तेलाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर :-
नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.93 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.34 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.1 2रुपये प्रति लिटर
चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92. 90 रुपये प्रति लिटर
नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.19 रुपये प्रति लिटर
प्रमुख शहरांमधील डिझेलचे दर :-
नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.32 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.44 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.20 रुपये प्रति लिटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.31 रुपये प्रति लिटर
नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.76 रुपये प्रति लिटर
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य