Take a fresh look at your lifestyle.

राकेश झुनझुनवालांचा ‘या’ एका शेअरसाठी लावलेला डाव झाला यशस्वी; 11 महिन्यात मिळाले 5 पट पैसे

मुंबई :

Advertisement

ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्सनेही कोरोना संकटापासून बरीच रिकव्हरी केली आहे. आणि 1 वर्षाच्या उच्चांकाजवळ व्यापार करीत आहे. गेल्या वर्षी 24 मार्च रोजी कोरोना विषाणू साथीच्या काळात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. तेव्हा तर टाटा मोटर्सचा शेअर अवघ्या 64 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. परंतु आता 11 महिन्यांनंतर, 22 फेब्रुवारी 2021 रोजी टाटा मोटर्स 310 रुपयांच्या आसपास व्यापार करीत आहेत.

Advertisement

म्हणजेच 11 महिन्यांत हा स्टॉक 5 पट वाढला आहे. त्यानुसार या काळात स्टॉकमधील गुंतवणूकदारांचे पैसेही 5 पट वाढले आहेत. या स्टॉकमध्ये भविष्य चांगले असल्याचीही माहिती मिळाली आहे.  

Advertisement

राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबरच्या तिमाहीत टाटा मोटर्सच्या शेअर्सचा आपल्या पोर्टफोलिओमध्ये समावेश केला. कंपनीत त्यांचे 4 कोटी शेअर्स आहेत. टाटा मोटर्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी पुढील तीन वर्षांत कंपनीचे कर्ज शून्य करणार असल्याचे जाहीर केले तेव्हा झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी केले. त्याच तिमाहीत कंपनीचा तोटा तिमाही आधारावर कमी झाला.

Advertisement

सप्टेंबर अखेरीस टाटा मोटर्सचा शेअर जवळपास 130 रुपयांवर होता. आज टाटा मोटर्सचे शेअर्स 310 रुपयांच्या जवळपास पोचले आहेत. फेब्रुवारीमध्येच हा शेअरही 1 वर्षाच्या उच्चांकाला 341 रुपयांवर पोहोचला. सप्टेंबरपासून हा शेअर दुप्पट झाला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply