Take a fresh look at your lifestyle.

IMP News : जिल्हा बँक बनली घराणेशाहीचा अड्डा; पहा नेमके काय म्हटलेय कुलकर्णी यांनी

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक परंपरागत जोश आणि आर्थिक उधळपट्टी यासाठीच ओळखली जाते. यंदाची निवडणूकही त्यास अजिबात अपवाद नव्हती. ही बँक फ़क़्त घराणेशाहीचा अड्डा बनली आहे. त्यावरच नेमके बोट ठेऊन कार्यकर्त्यांनी ही बँक घराणेशाहीच्या जोखडातून बाहेर काढण्याचे आवाहन शिक्षक व सामाजिक अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.

Advertisement

एकूण २१ संचालकांपैकी १३ संचालक हे आमदार, माजी आमदार किंवा आमदारांच्या कुटुंबीयांपैकी आहेत. म्हणजेच ६२ टक्के प्रतिनिधी हे आमदार कुटुंबातून आले. त्यामुळे ही बँक आमदारांच्या कुटुंबीयांसाठी राखीव आहे काय, असा प्रश्न कुलकर्णी यांनी दिव्य मराठी यांच्याशी बोलताना केला आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, कार्यकर्त्यांनो आजूनही सावध व्हा, अन्यथा पुढील काळात आमदारांच्या कुटुंबीयांची चौथीही पिढी जिल्हा बँक व सहकारी साखर कारखान्यातूनच दिसेल. सहकाराला गती देताना तळागाळातल्या माणसांचे आर्थिक सक्षमीकरण व त्याच वेळी सामान्य कुटुंबीयांतील नेतृत्व पुढे यावे असा विचार होता. त्यातून सत्तेचे विकेंद्रीकरण होईल, यादृष्टीने राजकीय नेतृत्व घडवणारी ही कार्यशाळा आहे, असाही विचार होता. पण सहकारी साखर कारखाने व जिल्हा बँकांतील राजकारण बघता तो हेतू पूर्णपणे फसला आहे.

Advertisement

आमदार कुटुंबीयांना राज्यस्तरावरील नेतृत्वाची संधी मिळत असल्याने त्यांनी दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना साखर कारखाने व बँकांमार्फत पुढे आणायला हवे. त्यातून जिल्ह्यात नेतृत्वाची दुसरी व तिसरी फळी निर्माण होऊ शकेल. परंतु आज आमदारांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे सदस्यही जिल्हा बँकेतून संचालक झालेले दिसतात. त्यामुळे एकाच कुटुंबाभोवती सत्ता फिरत राहिल्याने जिल्ह्यातील राजकीय सरंजामदारी वाढतेय व राजकीय नेतृत्व गरीब बहुजन कुटुंबातील तरुणांमधून पुढे येत नाही, असे दुर्दैवाने घडते आहे, असे स्पष्ट मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

विधानसभेच्या ११६ मतदारसंघातून ९४ उमेदवार घराणेशाहीचे, लोकसभेच्या २० मतदारसंघातून १९ उमेदवार घराणेशाहीचे, २० जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांपैकी १५ जण घराणेशाहीचे आणि २० जिल्ह्यातील १९९ साखर कारखान्यांपैकी ९९ अध्यक्ष घराणेशाहीचे दिसले. नगरसह पश्चिम महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील लोकसभा व विधानसभा, जिल्हा परिषद व साखर कारखान्यातून घराणेशाहीची पकड अधिक मजबूत आहे. परंतु दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळावी याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply