Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : म्हणून विखे-कर्डिले यांच्या गौप्यस्फोटाकडे लागले सर्वांचे लक्ष..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये 21 पैकी फ़क़्त 4 जागांवर निवडणूक झाली. 17 जागा बिनविरोध झाल्याने अनेक मतदारांचा भ्रमनिरास झाला. मात्र, निकाल लागल्यावर आता भाजपचे भासदार डॉ. सुजय विखे आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे कोणते गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

डॉ. विखे यांनी निकालाच्या अगोदरच गौप्यस्फोट करायचे जाहीर केलेले आहे. तर, कर्डिले यांनी नगर तालुका सोसायटी मतदारसंघातून विजयी झाल्यावर काही आरोप करून गौप्यस्फोट करण्याची घोषणा केली आहे. आता हे दोन्ही नेते भाजपचे आहेत. त्यामुळेच हे दोन्ही नेते आपल्याच पक्षाच्या बाबतीत की महाविकास आघाडीच्या बाबतीत गौप्यस्फोट करणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

निवडणूक जाहीर झाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कर्डिले आणि माजी मंत्री राम शिंदे यांची समिती नियुक्त करून ही बँक ताब्यात घेण्याच्या सूचना केल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीची मोट बांधली होती.

Advertisement

मात्र, पुढे कर्डिले थेट संगमनेर येथील बैठकीला दिसल्याने आता ते बिनविरोध होणार अशीच चर्चा सुरू झाली. मात्र, अखेरीस थोरात-पवार यांच्या महाविकास आघाडीच्या गटाने कर्डिले यांच्या विरोधात उमेदवार दिला. तरीही कर्डिले यांचा दणक्यात विजय झाला. मात्र, बिनविरोध संधी न मिळाल्याची बोच कर्डिले यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. तसेच आता तर गौप्यस्फोट करण्याची घोषणाही केली आहे.

Advertisement

डॉ. विखे यांनीही मतदान होण्यापूर्वी निवडणुकीच्या बाबतीत काही गौप्यस्फोट करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांनी त्याची दिशा स्पष्ट केलेली नाही. तर, कर्डिले यांनी म्हटले आहे की, शेतकरी, दूध उत्पादकांसह महिला बचत गटांना दिलासा दिला, परंतु जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ते भावले नसल्याने मी संचालक होऊ नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मला पाडण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. परंतु तो अपयशी ठरला. या कारखानदार मंडळींबाबत लवकरच मी गौप्यस्फोट करणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply