Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : गायकवाडांचा विजय; मात्र आघाडीच्या ‘त्या’ मतदानाचा बसलाच झटका..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत पराभव झाल्याने दत्ता पानसरे यांचा निवडणुकीच्या राजकारणात पहिलाच पराभव झाला आहे. मात्र, तरीही या बिगरशेती मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी विजयी उमेदवार प्रशांत गायकवाड यांना चुरशीची लढत दिली आहे. अगदी आघाडीच्या मतदानाला खिंडार पाडण्यातही त्यांनी यश मिळवले आहे.

Advertisement

या मतदारसंघात १३३७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी अगोदरच उमेदवारी मिळवण्यात मोठी चुरस होती. उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत अनेक दिग्गज होते. मात्र, सर्वांच्या तुलनेने पारनेर बाजार समितीच्या प्रशांत गायकवाड यांच्याकडे कोणाचेही विशेष लक्ष नव्हते. तरीही पवारांच्या बारामतीने उमेदवारीचा कौल त्यांना दिला.

Advertisement

महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या काही मंडळींना हा धक्का होता. मग त्यांनी या निवडणुकीबाबत नरो वा कुंजरोवा भूमिका घेतली. किंवा काहींनी तर वेगळी वाट धरली. परिणामी दक्षिण नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि नगर या तीन तालुक्यांमध्ये अनेकांनी अर्थपूर्ण पद्धतीने वेगळीकडे मतदानाचे माप टाकले.

Advertisement

गायकवाड यांनी उमेदवारी निश्चित आल्याचे गृहीत धरून अगोदरच मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. तर, पानसरे हे सोसायटी मतदारसंघातून लढणार असेच गृहीत धरले जात होते. परिणामी दोनवेळा मतदारांच्या भेटीला जाण्यात गायकवाड यांना यश आले. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व तालुक्यांमध्ये मतदानाचे योग्य नियोजन घडवून आणून अंतर्गत विरोध असूनही हा विजय खेचून आणला आहे.

Advertisement

अंतर्गत विरोधामुळे किमान सुमारे 70 मतदान कमी मिळाल्याची चर्चा आहे. गायकवाड समर्थकांनी या निवडणुकीत आपल्या कौशल्याचा आणि सर्व घडामोडी घडवून आणण्याची ताकद जिल्ह्याला दाखवून दिली आहे. त्यामुळेच काही आमदारांचा विरोध असतानाही त्यांनी हा विजय दणक्यात खेचून आणल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply