Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : रात्रीतून फिरले चक्र आणि कर्जतमध्ये झाला पिसाळांचा निसटता विजय..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक कमी फरकाने निसटता विजय मिळवत अंबादास पिसाळ यांनी संचालक हे महत्वाचे पद मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह काँग्रेस आणि शिवसेना यांनी महाविकास आघाडीच्या नावाखाली एकीची वज्रमूठ आवळली असूनही कर्जतच्या सोसायटी मतदारसंघातून मीनाक्षी साळुंके यांचा अवघ्या एक मताने पराभव झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

Advertisement

अर्थकारण हे या निवडणुकीचे अविभाज्य अंग आहेच. मात्र, त्यातही व्यवस्थापन आणि भविष्याच्या निवडणुकीसाठी एकमेकांची होणारी मदत लक्षात घेऊन इथे मतदार आपले मताचे दान उमेदवारांच्या पारड्यात टाकतात. कर्जतमध्येही सर्वपक्षीय मतदारांशी योग्य समन्वय आणि संवाद ठेऊन पिसाळ यांनी विजय खेचून आणला आहे.

Advertisement

निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडताना राष्ट्रवादीकडे तब्बल 45 मतदार असल्याचे स्पष्ट दिसत होते. अगदी या मतदारांनी बारामतीच्या दरबारी जाऊनही आपण यंदा मतदानाचे ‘योग्य’ कर्तव्य पार पडण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी याप्रकरणी निश्चिंत होती. मात्र, अखेरच्या क्षणी काहीतरी वेगळे घडले आणि पिसाळ यांच्या पारड्यात 9 मतदारांनी आपले मत टाकून राष्ट्रवादीला झटका दिला.

Advertisement

 कर्जत सोसायटी मतदार संघाची लढत मीनाक्षी साळुंके व अंबादास पिसाळ यांच्यात झाली. कर्जत सोसायटी मतदार संघाच्या 74 मतदारांपैकी 73 जणांनी मतदान केले होते. मतमोजणीमध्ये अंबादास पिसाळ यांना अवघ्या एक मताने विजयी झाले. यामध्ये साळंके यांना 36, तर पिसाळ यांना 37 मते मिळाली. रात्रीतून नेमके काय घडले याचीच अनेकांना उत्सुकता आहे.

Advertisement

एकूणच मतदानाला एकाचवेळी 45 जण आलेले असतानाही पिसाळ यांना 37 मतदान झालेच कसे याचे कोडे राष्ट्रवादीला पडले आहे. नेमके कोणते ‘अर्थ’पूर्ण कारण घडले आणि 9 जणांनी भाजपच्या पारड्यात मतदान केले याचीच चर्चा त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यात आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply