Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो… आता ‘त्या’ मंत्र्यांनाही कोरोना; महाविकास आघाडीचे 5 नेते कोरोनाच्या विळख्यात

नाशिक :

Advertisement

गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता जेष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाने घेरले आहे.

Advertisement

राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्वसामान्यांसह व्हीव्हीआयपी व्यक्ती देखील कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. राज्यातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. 

Advertisement

आता मंत्रालयात देखील कोरोनाने पुन्हा एकदा प्रवेश केला असुन कोरोनाची बाधा महसुल विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांना झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

दरम्यान भाजप आणि मनसे नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना झालेल्या कोरोनावर शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय, असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

Advertisement

मागील २४ तासांमध्ये भारतामध्ये कोरोनाचे १४ हजार १९९ रुग्ण आढळून आले आहेत. भारतामधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा या रुग्णसंख्येसोबतच एक कोटी १० लाखांच्या वर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात सलग पाचव्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून ही चिंतेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply