Take a fresh look at your lifestyle.

शिवसेना नेते अनंत तरे यांचे निधन; भूषवले होते महापौर, आमदारपद

मुंबई :

Advertisement

शिवसेना नेते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते तसेच एकवीरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांचे निधन झालं आहे. ते 67 वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सून, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना ब्रेन हेमरेंजचा त्रास होता. या आजारावर त्यांचे दीर्घकाळ उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisement

अनंत तरे यांची अशी होती ओळख :-

Advertisement

अनंत तरे हे शिवसेनेचे फायरब्रँड नेते.

Advertisement

ठाणे महापालिकेचे महापौर

Advertisement

2000 ते 2006 या दरम्यान विधानपरिषद आमदार

Advertisement

शिवसेनेचा कोळी समाजाचा बडा चेहरा

Advertisement

एकविरा देवी ट्रस्ट अध्यक्ष

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply