Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील ‘त्या’ शहरात लागला लॉकडाउन; दारूच्या दुकानात लांबच लांब रांगाच रांगा

मुंबई :

Advertisement

राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील करोनाचे प्रमाण पुन्हा लक्षणीयरित्या वाढत आहे ही काळजीची बाब असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Advertisement

त्यामुळे हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी यापुढील काळात सार्वजनिक स्वरूपातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अशातच कालपासून अमरावतीमध्येही लॉकडाउन पडणार असल्याचे समजत आहेत.

Advertisement

अमरावती शहरात पुन्हा लाॅकडाऊन लागू होणार असल्याने सर्वच वस्तू खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसत आहे. दारू घेण्यासाठी दारूच्या दुकानासमोरही नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

Advertisement

पुन्हा एकदा ‘उठ बेवड्या जागा हो, अर्थव्यवस्थेचा धागा हो’, असे म्हणत तळीरामांनी दारूच्या दुकानासमोर रांगा लावायला सुरुवात केली आहे. दारूच्या दुकाणासमोर रांगा, माॅलमध्ये गर्दी तसेच बस स्थानकातही मोठी गर्दी झाली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज रात्री आठ वाजतापासून अमरावती आणि अचलपूर शहरात लाॅकडाऊनची घोषणा केलीय. पुढील सात दिवस कडेकोट लाॅकडाऊन पाळला जाणार आहे.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply