जर आपण एकरकमी पैसे कुठेतरी जमा करण्याचा विचार करत असाल तर आपण एसबीआयच्या न्युइटी डिपॉझिट योजनेचा(Annuity Deposit Scheme) विचार करू शकता. एसबीआयच्या या योजनेअंतर्गत ठेवीदारास एक वेळ मुबलक रक्कम जमा करावी लागेल, त्यानंतर त्याला ही रक्कम एका विशिष्ट वेळी ईएमआय (मासिक हप्ता) म्हणून मिळेल.
जेव्हा आर्थिक अस्थिरतेचे वातावरण असते, अशा परिस्थितीत ही एक चांगली योजना असते कारण ती बचत खात्यापेक्षा जास्त दराने व्याज देते. या योजनेंतर्गत मुदत ठेवींवर(टर्म डिपॉजिट्स) ज्या व्याजदराने व्याज मिळते ते देखील त्यात मिळते.
कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा एक भाग होऊ शकतो तसेच एकट्याने किंवा संयुक्तपणे या योजनेचा भाग होता येते.
ही आहेत या योजनेची वैशिष्ट्ये :-
- योजनेंतर्गत ग्राहकाला एकदाची मुबलक रक्कम द्यावी लागेल आणि त्यानंतर मासिक हप्ता म्हणून मूळ व व्याज मिळेल.
- डिपॉजिट पीरियड- 36 महीने, 60 महीने, 54 महीने किंवा 120 महीने.
- एसबीआयच्या प्रत्येक शाखेत उपलब्ध
- मिनिमम डिपॉजिट – 25 हजार रुपये.
- मिनिमम एन्यूटी- 1 हजार रुपये
- एसबीआई स्टॉफ आणि एसबीआई पेंशनर्सला 1 % अधिक व्याज मिळेल.
- वरिष्ठ नागरिकांना 0.5 % अधिक व्याज
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक
- आई..गं.. हेडफोनचा बसतोय असाही फटका; कोट्यावधी लोकांवर झालेत ‘हे’ दुष्परिणाम.!
- ‘तिथे ठेवलेत राठोडांनी दिलेले 5 कोटी’; पूजाच्या आजीने केला धक्कादायक दावा
- पूजाप्रकरणी कोटींचे दावे; आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात गोंधळ..!